breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

#waragainstcorona: पिंपरी-चिंचवडमध्ये आणखी चारजणांचे रिपोर्ट पॉझिटीव्ह

पिंपरी । महाईन्यूज । प्रतिनिधी

चिंचवड स्टेशन येथील तिघांचे आणि पुण्यातील पण वायसीएममध्ये उपचार सुरु असलेल्या एक महिलेचे अशा चार जणांचे आज (गुरुवारी) रिपोर्ट पॉझिटीव्ह आले आहेत. यामुळे सक्रिय रुग्णांची संख्या 75 झाली आहे. तर, आजपर्यंत शहरातील आणि शहराबाहेरील पण वायसीएम रुग्णालयात उपचार सुरू आहेत अशा 160 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तर, 63 जण कोरोनामुक्त झाले असून सात जणांचा मृत्यू झाला आहे.

महापालिकेने बुधवारी (दि. 6) 76 कोरोना संशयितांचे नमुने तपासणीसाठी एनआयव्ही आणि ‘नारी’कडे पाठविले होते. त्याचे काही रिपोर्ट सकाळी आले आहेत. त्यामध्ये चिंचवड स्टेशन येथील 18 आणि 30 वर्षीय पुरुषांचे तर 32 वर्षीय एक महिला असे तिघांचे रिपोर्ट पॉझिटीव्ह आले आहेत. तर, पुणे, वाकडेवाडी येथील 28 वर्षीय महिलेचेही रिपोर्ट पॉझिटीव्ह आले आहेत, अशी माहिती महापालिकेचे अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पवन साळवे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली.

दि. 10 मार्चपासून पिंपरी-चिंचवड शहरातील आणि शहराबाहेरील पण शहरात उपचार सुरू आहेत अशा 160 जणांना आजपर्यंत कोरोनाची लागण झाली. त्यापैकी 63 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. महापालिका रुग्णालयात कोरोना बाधित सक्रिय 75 रुग्णांवर आणि शहरातील नऊ रुग्णांवर महापालिका क्षेत्राबाहेरील रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तर, शहराबाहेरीलही नऊ रुग्णांवर पिंपरी महापालिकेच्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत. शहरातील 60 आणि शहराबाहेरील 3 असे 63 रुग्ण आतापर्यंत कोरोनामुक्त झाले आहेत. तर, 12 एप्रिल रोजी थेरगाव भागातील एका पुरुषाचा, 20 एप्रिल रोजी निगडीतील एका महिलेचा आणि पुण्यातील रहिवाशी पण वायसीएममध्ये दाखल असलेल्या एका महिलेचा आणि 24 एप्रिल रोजी निगडीतील एका पुरुष रुग्णाचा, 29 एप्रिल रोजी खडकीतील एका महिलेचा, 6 मे रोजी पुण्यातील शिवाजीनगर येथील महिलेचा आणि येरवडा येथील एका महिलेचा वायसीएम रुग्णालयात अशा सात जणांचा कोरोनामुळे आजपर्यंत मृत्यू झाला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button