breaking-newsआंतरराष्टीयटेक -तंत्रताज्या घडामोडी

चीनला दणका! भारतीय इलेक्ट्रिक इंडस्ट्रीने रद्द केल्या अनेक ऑर्डर्स, होणार कोट्यवधींचं नुकसान

नवी दिल्ली: भारत आणि चीममधील वाढत्या संघर्षानंतर भारताकडून चीनमधून मागवण्यात येणारे सामान बहिष्कृत केले जात आहे. एका मीडिया अहवालातील वृत्तानुसार गेल्या काही दिवसात भारतीय इलेक्ट्रिकल इक्विपमेंट आणि इलेक्ट्रॉनिक्स इंडस्ट्रीने चिनी कंपन्यांच्या ऑर्डर्स मोठ्या प्रमाणात रद्द करण्यास सुरूवात केलेली आहे. आता या ऑर्डर्ससाठी नवीन पर्याय शोधण्यात येत आहे.

या कंपन्या मुख्यत्वे पॉवर डिस्ट्रिब्यूशन आणि ट्रान्समिशन गिअरच्या ऑर्डर्स रद्द करत आहेत. इतर देशामध्ये यांची किंमत जरी अधिक असली तरी त्याठिकाणाहून या ऑर्डर्स मागवण्यात येणार आहेत. एका वृत्तपत्रामध्ये यासंदर्भात वृत्त देण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आत्मनिर्भर होण्याचा आवाहन केल्यानंतर यासंदर्भातील पावलं उचलण्यास सुरुवात झालेली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button