TOP Newsताज्या घडामोडीदृष्टीक्षेपदेश-विदेशपिंपरी / चिंचवड

पिंपरी-चिंचवडः ‘फ्रीडम टू वॉक सायकल रन’ मध्ये विजयी अधिकाऱ्यांचा आयुक्तांच्या हस्ते सन्मान

पिंपरी : भारत सरकारच्या गृहनिर्माण व शहरी व्यवहार मंत्रालय आणि स्मार्ट सिटी यांच्या संयुक्त विद्यमाने ‘फ्रीडम टू वॉक सायकल रन’ मोहीम राबविण्यात आली होती. मोहिमेतील पहिल्या भागात देशपातळीवर यश संपादन करणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांचा प्रशासक शेखर सिंह यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

सत्कारार्थींमध्ये शहर अभियंता मकरंद निकम, सहशहर अभियंता प्रमोद ओंभासे, कनिष्ठ अभियंता अमित दिक्षित, स्वप्नील शिर्के आणि संगणक चालक अनंत चुटके यांचा समावेश आहे. महापालिकेच्या पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय भवनामध्ये हा सत्कार समारंभ झाला. यावेळी अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील, जितेंद्र वाघ, उल्हास जगताप, मुख्य लेखा परिक्षक प्रमोद भोसले, मुख्य लेखा व वित्त अधिकारी जितेंद्र कोळंबे, उपआयुक्त, सह शहर अभियंता, सहायक आयुक्त, विभागप्रमुख उपस्थित होते.

शहरातून एकूण १० सिटी लिडर्सने मोहिमेत सहभाग नोंदविला आहे. उपक्रमाचा निकाल १९ एप्रिल २०२३ रोजी जाहीर करण्यात आला. वैयक्तिक पातळीवर महानगरपालिकेचे कनिष्ठ अभियंता अमित दिक्षित यांनी सायकलिंगमध्ये प्रथम क्रमांक व संगणक चालक अनंत चुटके यांनी चौथा क्रमांक पटकावला. तसेच रनिंगमध्ये कनिष्ठ अभियंता प्रसाद देशमुख यांचा देशात द्वितीय क्रमांक व स्वप्नील शिर्के यांनी पाचवा क्रमांक पटकावला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button