TOP NewsUncategorizedताज्या घडामोडीविदर्भ

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जोरदार भाषण केले यामध्ये ‘शेतकरी आत्महत्या मुक्त राज्य’ करणार

अकोला : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जोरदार भाषण केले यामध्ये ‘शेतकरी आत्महत्या मुक्त राज्य’ करणार असल्याची घोषणा केली. दरम्यान मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडून शेतकरी आत्महत्यामुक्त राज्याची घोषणा झाली. पण, यावर अद्याप कृषी विद्यापीठाला कुठल्याही प्रकारचे आदेश व सुचना प्राप्त झाल्या नाही, अशी माहिती अकोल्याचे डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू विलास भाले यांनी ‘मटा ऑनलाइन’शी बोलतांना सांगितले. सोबतचं शेतकरी आत्महत्या रोखण्यापासून सरकारने काय करावे, याचा सल्लाही सरकारला दिला आहे.

राज्यात मोजक्याच कृषी विद्यापीठ असून अकोल्याचे डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ हे विदर्भातील एक मोठे कृषी विद्यापीठ आहे. विदर्भातील एकूण ११ जिल्हे या विद्यापीठाच्या अखत्यारीत येतात. देशमुख कृषी विद्यापीठाचा मुख्य कॅम्पस अकोला शहरात आहे व नागपूर इथे दुसरा कॅम्पस आहे. दरम्यान, अकोल्यात कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास भाले यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी ते बोलते होते.

या कारणाने शेतकऱ्यांचे अधिक आत्महत्या….

राज्यातील ४ कृषी विद्यापीठ असून यामध्ये अकोल्याच्या विद्यापीठ अंतर्गत असलेल्या यवतमाळ जिल्ह्यात दुर्दैवाने मोठ्या प्रमाणात शेतकरी आत्महत्या झालेल्या आहेत. विदर्भात कोरडवाहू क्षेत्र जास्त आहे. महत्त्वाचा असा भाग आहे की विदर्भामध्ये पाऊस जास्त असला, त्यात कापूस आणि सोयाबीन हे पिक जास्त घेतल्या जाते, याचं कारण हे नगदी पिक आहे, पैसे देणारे पिक असून खर्चही आहे. त्यामुळे या दोन पिकाखालीचं क्षेत्र जास्त व्यापलेल आहे. जर कापसाची लागवड केल्यास ५ ते ६ तर सोयाबीनला ३ ते ४ वेळा फवारणी करावी लागते. साधारणता हे पीक पाच ते सहा महिन्याचं असते, ऑक्टोबरपर्यंत फुल तयार होतं अन् त्यात अनेक भागात बोंड अळीचा प्रादुर्भाव होतो, कितीही फवारणी केल्यास त्याच्यावर नियंत्रण येतं नाही. अशा काळात उत्पन्न कमी होते आणि शेतकरी संकटात सापडतोय, यामुळ लागवड ते बियाणे, फवारणी यासह अन्य खर्चही झालेल्या उत्पनातून निघत नाही. त्यात बाजारामध्ये बाजार भाव पण कमी-जास्त होत असल्याने शेतकरी कर्जबाजारी म्हणजे सर्व बोजा त्याच्यावर येतो. या नेरशातून शेतकरी आत्महत्याच पाऊल उचलतात.

कुलगुरूंचा सरकारला सल्ला…

सरकारने यासाठी उद्योगकता निर्माण करणे आवश्यक आहे. शेतीला पूरक उद्योगता करणे, दुग्ध व्यवसाय, रेशीम उद्योग, कुक्कट पालन आवश्यक आहे. शेतकऱ्यांच्या हातामध्ये पैसा खेळता राहिला पाहिजे. कारण, शेतकरी हा कापसामध्ये सहा महीने मेहनत करतो. त्यानंतर पैशांसाठी वंचित राहतोय. यासाठी सरकारने शेतकऱ्यांच्या हातात पैसा कसा खेळता राहील, यावच्यावर वर्धन आणणे आवश्यक आहे, असा सल्ला कृषी विद्यापीठाचे कुलगुरू विलास भाले यांनी दिला.
पुढे बोलताना ते म्हणाले की, उद्योग जर असेल तर यातून शेतकरी बाहेर पडू शकतो. सोबतचं सरकारने बकरी, गायी अन्य गोष्टींना शेतकऱ्यांना अनुदान दिले तर त्याचा उद्योग निर्माण होईल अन् रोजगार उपलब्ध होईल. तेव्हाच हे प्रश्न मार्गी लागणार अन् निश्चितच शेतकऱ्यांच्या हातातही खेळता पैसा राहणार, असेही ते म्हणाले.

शेतकऱ्यांना विद्यापीठाचा सल्ला…
शेतकऱ्यांनी कमी खर्चाचं पिक घ्या, कारण पाऊस जरी जास्त असला तरी विदर्भामध्ये कोरडवाहू क्षेत्र जास्त आहे अन् १७ टक्केच क्षेत्र पाण्याखाली आहे. त्यामुळ शेतकरी कापूस आणि सोयाबीन पीक घेत असाल तर त्यासोबतचं तुर अन् अन्य पिके घावे, जेणे करून फवारणीसह लागवडीचा खर्च निघायला हातभार लागणार. शेतकऱ्यांनी शेती पीक पद्धतीत बदल करणे आवश्यक आहे. कारण ‘जे विकेल तेचं पिकवण्याचा प्रयत्न शेतकऱ्यांनी केला पाहिजे, अभ्यासपूर्वक शेती शेतकऱ्यांनी करणे सद्यस्थितीत आवश्यक असल्याचेही कुलगुरू म्हणाले. अन् कमी खर्चाचं पिक म्हटलं म्हणजे ज्वारी अन् हरभरा असे आहेत.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button