breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकारण

संभाजीराजे तुम्ही एका समाजाची बाजू घेऊन कसं बोलता? छगन भुजबळांचा सवाल

मुंबई : छगन भुजबळांची मंत्रिमंडळातून तात्काळ हकालपट्टी करा, असं माजी खासदार संभाजीराजे छत्रपती म्हणाले. दरम्यान, यावरून छगन भुजबळ यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते इगतपुरी येथील कार्यक्रमात बोलत होते. संभाजीराजे तुम्ही छत्रपती शाहू महाराजांच्या गादीवर बसला आहात, त्यामुळे तुम्ही फक्त एका समाजाची बाजू घेऊन कसं बोलता? असा सवाल भुजबळांनी उपस्थित केला.

छगन भुजबळ म्हणाले, संभाजीराजे म्हणाले की, भुजबळ दोन समाजामध्ये वितुष्ट निर्माण करत आहेत. त्यांना मंत्रिमंडळातून काढून टाका. संभाजीराजे आम्ही तुमचा आदर, सन्मान करतो. कारण आमच्या हृदयात असलेले शाहू महाराज, जे मागासवर्गीयांना वरती आणण्यासाठी त्यांची बाजू घेऊन लढत होते, ते शाहू महाराज आहे. त्या शाहू महाराजांच्या गादीवर तुम्ही आहात. तुम्ही एका समाजाचे नाहीत. तुम्ही या राज्यातील सर्व समाजाचे आहात. तुम्ही एका समाजाची बाचू घेऊन कसं बोलता?

हेही वाचा – IND vs AUS Final : वर्ल्डकप फायनलच्या दिवशी कोण-कोणते कार्यक्रम होणार? वाचा..

एकतर तुम्ही या आरक्षणाच्या प्रकरणात यायलाच नकोत. आलात तर सांगितलं पाहिजे की, सर्वांचे अधिकार शाबूत ठेवा. कुणावरही अन्याय करु नका. ही अपेक्षा संभाजीराजेंकडून आम्हाला आहे. घरेदारे कुणी जाळली? मी जाळली? दोन महिने जे घडलं त्यावर मी काही बोललो? घरेदारे जाळली तेव्हा तुम्ही बोलायला हवं होतं. तुमचं काम होतं राजे, नाही असं करु नका रे, असं सांगायला हवं होतं, असं छगन भुजबळ म्हणाले.

राजे तुम्ही स्वत: बीडला जायला हवं होतं. जनतेची घरे, दुकानं, हॉटेल जाळण्यात आली. पेट्रोल बॉम्ब फेकण्यात आले. तुम्ही त्यांचे अश्रू पुसायला हवे होते. महाराज हे तुमचंही काम नाही का? पण तुम्ही सांगतात, हे भुजबळ करतो. लक्षात ठेवा महाराज, छगन भुजबळाला मंत्रिपदाची पर्वा नाही, ना आमदारपदाची पर्वा नाही. तो गोरगरीबांसाठी लढेल. पण तुम्ही राज्याचे महाराज आहात ना? छत्रपती शाहूंच्या गादीवर तुम्ही बसता, तर महाराज सर्वांना न्याय द्या. अन्याय होणार नाही याची काळजी घ्या, असंही छगन भुजबळ म्हणाले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button