TOP Newsताज्या घडामोडीमनोरंजनमुंबई

सृष्टी तावडेच्या रॅपने सर्वसामान्य महिलांना मिळालं बळ, जाणून घ्या

मुंबई :  एमटीव्हीच्या हसलं 2.0मधून चर्चेत आलेली व सध्या तरुणांच्या गळ्यातली ताईत बनलेली रॅपर सृष्टी तावडे सोशल मीडियावर खूप चर्चेत आहे. सोशल मीडियावर तिच्या रॅपचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत आहेत. या तिच्या व्हिडीओंना जवळपास सर्व वयोगटातील प्रेक्षक वर्गातून पसंती मिळत आहे. मात्र या सर्वात सृष्टी तावडेच्या रॅपचा सर्वाधिक प्रभाव सर्वसामान्य महिलांवर दिसून येत आहे. या महिलांना या रॅपमधून बळ मिळत आहे. नेमक या रॅप मधून महिलांना कसं बळ मिळतय हे जाणून घेऊयात. 

सृष्टी तावडेच्या रॅपने सर्वसामान्य महिलांना बळ मिळत आहे. अनेक महिला सृष्टी तावडेच ‘मैं नहीं तो कौन बे’ रॅप गाताना दिसत आहेत. तसेच या रॅपचे व्हिडिओ त्या इंस्टाग्रामवर पोस्ट करत आहेत. अशाच अनेक सर्वसामान्य महिला अशाप्रकारचे व्हिडिओ बनवून पोस्ट करत आहेत.

व्हिडीओत काय?

व्हिडिओत तुम्ही पाहू शकता, अनेक महिला घरची कामे करताना दिसत आहे. हे काम करता करता या महिला ‘मैं नहीं तो कौन बे’ हा रॅप गाताना दिसत आहे. मात्र या रॅप मध्ये काही बदल करून त्यांनी त्याच्या काही ओळी देखील जोडल्या आहेत. जसे ‘मैं नहीं तो कौन बे’, ‘हैं कौन इधर!’,’माना काम वाली बाई नही हैं’,’पर ऐसा नहि हैं की, मुझको आता नही है!’. अशाप्रकारचा बदल करून या महिला हे रॅप गाताना सोशल मीडियावर दिसत आहेत.  

https://www.instagram.com/bella_girl.official/?utm_source=ig_embed&ig_rid=876c141f-2e37-4ca7-ac01-c47ce5106088

दरम्यान देशात अशा असंख्य महिला आहेत, ज्या त्यांच्या स्वप्नांचे पंख छाटून घराची जबाबदारी सांभाळत आहेत. नुसत चूल आणि मूल यापुरत्याच त्या मर्यादित राहिल्या आहेत. स्वप्नांना त्यांच्या आधीच ब्रेक लागला आहे त्यात आता त्या करत असलेल्या मेहनतीकडेही दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे या मेहनतीची जाणीव कुटूंबियांना व समाजाला व्हावी यासाठी महिलांनी सृष्टी तावडेच्या रॅपचा आधार घेतला आहे. आणि त्या ‘मैं नहीं तो कौन बे? हा रॅप गात आहेत. 

दरम्यान अशाप्रकारे सृष्टी तावडेच्या  रॅपने सर्वसामान्य महिलांना बळ मिळत आहे. तसेच या सर्वसामान्य महिलांचे व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button