breaking-newsताज्या घडामोडीराजकारणराष्ट्रिय

‘आज के शिवाजी-नरेंद्र मोदी’ पुस्तकाच्या वादावरून जयभगवान गोयल यांच्यावर गुन्हा दाखलं…

‘आज के शिवाजी-नरेंद्र मोदी’ या पुस्तकामध्ये मोदींची तुलना छत्रपती शिवाजी महाराजांसोबत करण्यात आली आहे. या पुस्तकावरुन राजकारण तापले आहे. त्याचसोबत शिवप्रेमी देखील संतप्त झाले असून आंदोलन करत आहेत. याप्रकरणी पुस्तकाचे लेखक जयभगवान गोयल यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोलापुरातील फौजदारी चावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सोलापूरातील शिवसेनेचे कार्यकर्ते दिनकर जगदाळे यांच्या फिर्यादीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख करुन पुस्तक प्रकाशन करून सामाजिक भावना दुखविल्या प्रकरणी जगदाळे यांनी तक्रार दाखल केली होती. सोलापुरातील फौजदार चावडी पोलिस ठाण्यात गोयल यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दिनकर जगदाळे यांनी तक्रारीमध्ये असे म्हटले आहे की, ‘आज के शिवाजी-नरेंद्र मोदी’ या पुस्तकामध्ये शिवरायांचा उल्लेख एकेरी शब्दा केले असल्याचे निदर्शनास आले आहे. मोदींची तुलना शिवरायांसोबत केली आहे. त्यामुळे देशातील तमाम शिवप्रमी आणि शिवभक्तांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. त्यामुळे देशात आणि महाराष्ट्रात अशा पुस्तकामुळे मोठ्या प्रमाणात असंतोष निर्माण झाला आहे. शिवरांयाबद्दल असा एकेरी शब्द वापरुन त्यांचा अवमान केला आहे.’

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button