Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीक्रिडाताज्या घडामोडी

विराट-अनुष्का भारत सोडणार? ‘या’ देशात शिफ्ट होणार; कोहलीच्या प्रशिक्षकाने केला खुलासा

Virat Kohli and Anushka Sharma | विराट कोहली आणि अनुष्का शर्मा लवकरच भारत सोडणार असल्याच्या सोशल मीडियावर चर्चा पाहायला मिळत आहेत. आता स्वतः विराटच्या लहानपणीचे प्रशिक्षक राजकुमार शर्मा यांनी याबाबत मोठा खुलासा केला आहे. कोहलीच्या प्रशिक्षकांच्या वक्तव्यामुळे चाहत्यांमध्ये उत्सुकता वाढली आहे.

राजकुमार शर्मा यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, होय, विराट पत्नी अनुष्का शर्मा आणि मुलांसह लंडनला शिफ्ट होण्याचा विचार करत आहे. तो लवकरच भारत सोडून तिथे स्थायिक होणार आहे. सध्या, क्रिकेटच्या जबाबदाऱ्यांबरोबरच तो आपल्या कुटुंबासोबत जास्त वेळ घालवत आहे.

हेही वाचा    –        विद्यार्थ्यांनो तयारीला लागा! MPSC कडून वर्षभराचे वेळापत्रक जाहीर

विराट बॉर्डर गावस्कर ट्रॉफीनंतर टेस्ट सीरिजमधून निवृत्ती घेईल? यावर राजकुमार शर्मा म्हणाले, नाही, विराट अजूनही खूप तंदुरुस्त आहे आणि निवृत्ती घेण्या इतपत त्याचे वय झालेले नाही. विराट आणखी ५ वर्षे क्रिकेट खेळेल, असा मला विश्वास आहे. विराट २०२७ च्या वर्ल्ड कपमध्येही खेळताना दिसणार आहे. विराट आणि माझ्यातील समन्वय खूप चांगला आहे. विराट १० वर्षांचा नव्हता तेव्हापासून मी त्याला चांगला ओळखतो. मी २६ वर्षांपासून त्याच्यासोबत आहे. म्हणूनच मी म्हणू शकतो की विराटमध्ये अजूनही भरपूर क्रिकेट शिल्लक आहे.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button