Breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

पीएमआरडीएच्या शिल्लक सदन‍िकांसाठी ३२७१ अर्ज

पिंपरी :  पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) पेठ क्रमांक १२ आण‍ि पेठ क्रमांक ३०-३२ येथील सदनिकांसाठी ऑनलाईन अर्ज मागव‍िण्यात आले होते. १५ डिसेंबरपर्यंत दिलेल्या मुदतवाढ कालावधीत ३ हजार २७१ अर्ज अनामत रकमेसह पीएमआरडीएकडे जमा झाले आहेत.

पीएमआरडीएच्या गृहप्रकल्पांतर्गत पेठ क्रमांक १२ येथील प्रधानमंत्री आवास योजना अंतर्गत ईडब्ल्यूएसमध्ये ४७ व एलआयजी प्रवर्गातील ६१४ सदनिका आहे. यासह पेठ क्रमांक ३०-३२ येथील ईडब्ल्यूएस (१ आरके) प्रवर्गातील ३४७ व एलआयजी (१ बीएचके) प्रवर्गातील ३२९ सदनिका अशा एकूण १ हजार ३३७ शिल्लक सदनिका आहे.

हेही वाचा    –        विद्यार्थ्यांनो तयारीला लागा! MPSC कडून वर्षभराचे वेळापत्रक जाहीर

या सर्व शिल्लक सदनिकांसाठी इच्छुकांकडून १५ ड‍िसेंबरपर्यंत अर्ज मागव‍िण्यात आले होते. यासाठी नागर‍िकांचा अपेक्ष‍ित प्रत‍िसाद म‍िळाला असून एकूण ३ हजार २७१ अर्ज प्राप्त झाल्याची माह‍िती जम‍ीन व मालमत्ता व‍िभागाचे सह आयुक्त ह‍िम्मत खराडे यांनी द‍िली.

पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या सदनिकांसाठी ३ हजार २७१ अर्ज अनामत रकमेसह प्राप्त झाले. संबंध‍ित सदन‍िकांच्या सोडतीची प्रारुप यादी १ जानेवारी २०२५ रोजी प्रस‍िध्द करण्यात येणार आहे. यावर २ जानेवारीपर्यंत आक्षेप घेता येईल. १३ जानेवारीला सोडतीसाठी स्वीकृत अर्जाची अंत‍िम यादी प्रसिद्ध करत २१ जानेवारीला ड्राय रननंतर २२ जानेवारीला अंत‍िम सोडत काढल्यानंतर पीएमआरडीएच्या संकेतस्थळावर सोडतीमधील यशस्वी व प्रतीक्षा यादीवरील अर्जदारांची नावे प्रसिद्ध करण्यात येतील, अशी माहिती पीएमआरडीएकडून देण्यात आली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button