Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीक्रिडाताज्या घडामोडी

टीम इंडियाचा दणदणीत विजय, पाकचा धुव्वा उडवत Super-8 मध्ये मारली धडक…

T20 World Cup 2026 : कोलंबोतील आर प्रेमदासा स्टेडियमवर रविवारी,टी-२० विश्वचषक २०२६ चा रोमांचक सामना खेळला गेला.या सामन्यात भारताने पाकिस्तानचा ६१ धावांनी पराभव केला.

नाणेफेक जिंकल्यानंतर पाकिस्तानने भारताला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. इशान किशनच्या झंझावाती अर्धशतकाच्या जोरावर टीम इंडियाने 20 षटकांत सात गडी गमावून 175 धावा केल्या. प्रत्युत्तरात पाकिस्तान संघ 18 षटकांत 10 गडी गमावून 114 धावाच करू शकला.

तत्पूर्वी, इशान किशनच्या अर्धशतकाच्या जोरावर भारताने पाकिस्तानसमोर १७६ धावांचे लक्ष्य ठेवले होते. भारताने २० षटकात ७ विकेट गमावत १७५ धावा केल्या होत्या. भारताकडून इशान किशनने अर्धशतक झळकावले. या सामन्यात कर्णधार सूर्यकुमार यादवने नाणेफेकीचा कौल गमावला आणि प्रथम फलंदाजी वाटेला आली. टीम इंडियासाठी एकूण ५ फलंदाजांनी दुहेरी आकडा गाठला. तर २ प्रमुख फलंदाजांना भोपळाही फोडता आला नाही.

हेही वाचा –  छत्रपतींचा अवमान करणाऱ्या काँग्रेसविरोधात भाजपाचे ‘जोडे मारो’

अभिषेक शर्मानं चार चेंडूंचा सामना केला आणि त्याला खातंही खोलता आलं नाही. या स्पर्धेत तो सलग दुसऱ्यांदा शून्यावर बाद झाला. त्यामुळे सोशल मीडियावर याच्यापेक्षा संजू सॅमसन बरा अशी चर्चा रंगली आहे.अभिषेक शर्मा पहिल्या सामन्यात गोल्डन डकवर बाद झाला होता. अमेरिकेविरुद्धच्या सामन्यात पहिल्याच चेंडूवर तो तंबूत परतला होता.

भारतासाठी इशान किशनने ४० चेंडूत १० चौकार आणि ३ षटकार मारत १९२.५० च्या स्ट्राईक रेटने सर्वाधिक ७७ धावांची खेळी केली. सैम आयुबच्या गोलंदाजीवर जोरदार फटका मारण्याच्या चुकला आणि त्रिफळाचीत झाला.याव्यतिरिक्त कर्णधार सूर्यकुमार यादवने २९ चेंडूंत तीन चौकारांच्या मदतीने ३२ धावा केल्या.

भारताकडून शिवम दुबे २७ धावा करून बाद झाला तर तिलक वर्माने २५ धावा केल्या. तिलक वर्मानंतर हार्दिक पांड्याही शून्यावर माघारी परतला. त्यानंतर मैदानात आलेला रिंकू सिंग हा चार चेंडूत एक चौकार आणि एक षटकाराच्या मदतीने 11 धावा केल्यानंतर नाबाद राहिला.

पाकिस्तानकडून गोलंदाजीत सैम अयुबने तीन, तर सलमान आगा, शाहीन आफ्रिदी आणि उस्मान तारिक यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.विशेष म्हणजे भारताविरुद्धच्या या सामन्यात पाकिस्तानने फिरकी गोलंदाजांसह १८ षटके टाकली. खेळपट्टीचा विचार करता, पाकिस्तानने प्रामुख्याने फिरकी गोलंदाजीचा वापर केला. फिरकी गोलंदाजांनी १८ षटके टाकली, तर वेगवान गोलंदाज शाहीन आफ्रिदीने उर्वरित २ षटके टाकली. संघाकडून ६ फिरकी गोलंदाजांसह एकूण ७ गोलंदाजांनी गोलंदाजी केली.

भारतीय क्रिकेट संघाने सूर्यकुमार यादव याच्या नेतृत्वात पाकिस्तान विरुद्ध टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत मोठा विक्रम केला आहे. वास्तविक, टीम इंडियाची टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या इतिहासातील १७५ ही सर्वोच्च धावसंख्या ठरली. टीम इंडियाने यासह स्वत:चाच रेकॉर्ड ब्रेक केला. टीम इंडियाने याआधी २०२२ साली पाकिस्तान विरुद्ध ७ विकेट्स गमावून १६० धावा केल्या होत्या.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button