Breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

कोयना हादरले, 4.8 रिश्टर स्केलचा भूकंप

महाईन्यूज अपडेट

सतारा जिल्ह्यात सकाळी भूकंपाचा धक्का बसला. कोयनापासून 10 किमी अंतरावर भूकंपाचा केंद्रबिंदू असल्याची माहिती असून या हाद-याने कोयणावासीय घाबरून  गेले आहेत. भूकंपाची तीव्रता 4.8 रिश्टर स्केल एवढी नोंदवण्यात आली आहे. जिल्ह्यातील कोयना परिसरात वारंवार भूकंपाच्या घटना घडतात.

जिल्ह्यातील या भूकंपाची तीव्रता मोठी असल्याचे सांगण्यात येत आहे. सुदैवाने कमी सेकंदाचा भूंकप जाणवल्याने तीव्रता मोठी असूनही कुठलेही नुकसान झाले नाही. कोयना, कराड आणि पाटण परिसरात या भूकंपाचा धक्का बसला आहे. सकाळी 7.48 मिनिटांनी भूकंपाचा धक्का बसला. सुरुवातीला काहीतरी गुढ आवाज आल्याने नागरिकांनी घराबाहेर येऊन पाहिले. मात्र, हा भूंकप असल्याचे समजताच घरातून बाहेर येत सुरक्षितस्थळी जाण्यासाठी सर्वांचीच धावपळ सुरू झाली होती. भूकंपानंतर जिल्ह्यातील कोयना परिसरात वास्तव्य करणाऱ्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button