Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

छत्रपतींचा अवमान करणाऱ्या काँग्रेसविरोधात भाजपाचे ‘जोडे मारो’

काँग्रेसचे नेते हर्षवर्धन सपकाळ यांच्या हकालपट्टीची मागणी

भाजपा शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे यांच्या नेतृत्त्वात पिंपरीत आंदोलन

पिंपरी-चिंचवड । प्रतिनिधी

भारतीय जनता पार्टी पिंपरी चिंचवड शहराच्या वतीने आज पिंपरी चौकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ जोरदार निदर्शने करण्यात आली. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि टिपू सुलतान यांची तुलना केल्याचा आरोप करत भाजपने तीव्र निषेध व्यक्त केला. आंदोलनादरम्यान सपकाळ यांच्या प्रतिमेस जोडे मारत घोषणाबाजी करण्यात आली आणि त्यांच्या तात्काळ हकालपट्टीची मागणी करण्यात आली.

शहराध्यक्ष शत्रुघ्न उर्फ बापू काटे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात कार्यकर्त्यांनी काँग्रेसविरोधी घोषणा देत परिसर दणाणून सोडला. “शिवरायांचा अवमान सहन केला जाणार नाही” अशा घोषणा देत संताप व्यक्त करण्यात आला.

यावेळी बोलताना शत्रुघ्न काटे म्हणाले की, “छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे आराध्य दैवत आहेत. त्यांच्या कार्याची आणि विचारांची तुलना इतर कोणत्याही सत्ताधीशांशी करणे म्हणजे महाराष्ट्राच्या अस्मितेवर आघात आहे. असे वक्तव्य करणाऱ्यांविरुद्ध काँग्रेसने केवळ माफीवर न थांबता कठोर कारवाई करावी. अन्यथा भाजप राज्यभर तीव्र आंदोलन छेडेल.”

हेही वाचा –  बंजारा सेवा संघ मावळच्यावतीने संत सेवालाल जयंती उत्साहात साजरी

आंदोलनात आमदार उमाताई खापरे, गटनेते प्रशांतभाऊ शितोळे, सदाशिवराव खाडे, सरचिटणीस मोरेश्वरभाऊ शेडगे, मधुकरभाऊ बच्चे, वैशालीताई खाडे यांच्यासह शहरातील प्रमुख लोकप्रतिनिधी, पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने कार्यकर्ते सहभागी झाले होते.

दरम्यान, काँग्रेसने या प्रकरणी ठोस भूमिका जाहीर न केल्यास आगामी काळात आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा भाजप पदाधिकाऱ्यांनी दिला आहे. पिंपरी चिंचवडमधील या आंदोलनामुळे राजकीय वातावरण तापले असून राज्यभर या विषयावर प्रतिक्रिया उमटत आहेत.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

“छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याचा आणि विचारांचा अवमान कोणत्याही परिस्थितीत सहन केला जाणार नाही. महाराष्ट्राच्या अस्मितेशी निगडित असलेल्या या विषयावर आम्ही ठाम आहोत. संबंधितांकडून तात्काळ माफी आणि योग्य ती कारवाई झाली नाही, तर जनतेच्या भावनांचा सन्मान राखण्यासाठी आम्ही लोकशाही मार्गाने अधिक तीव्र आंदोलन उभारू. शिवरायांचा सन्मान अबाधित ठेवणे हीच आमची भूमिका आणि बांधिलकी आहे.”

– शत्रुघ्न उर्फ बापू काटे, शहराध्यक्ष, भाजपा, पिंपरी-चिंचवड, पुणे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button