Breaking-newsताज्या घडामोडीपश्चिम महाराष्ट्रपिंपरी / चिंचवडराजकारण

मोठी बातमी : शहराध्यक्ष योगेश बहल यांना विधान परिषदेवर संधी द्या!

राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांचे नेतृत्वाकडे साकडे

पिंपरी चिंचवड । प्रतिनिधी : पिंपरी चिंचवड शहरातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या आजी-माजी नगरसेवक, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या शिष्टमंडळाने शहराध्यक्ष तथा माजी महापौर योगेश बहल यांना आगामी विधान परिषदेची संधी देण्याची जोरदार मागणी केली आहे.

या मागणीसाठी शिष्टमंडळाने मुंबई येथील देवगिरी निवासस्थानी पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा तथा राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि राज्यसभा खासदार पार्थ पवार यांची भेट घेऊन निवेदन सादर केले.

शिष्टमंडळाने आपल्या निवेदनात नमूद केले की, योगेश बहल यांनी सन १९९२ पासून सलग सात वेळा नगरसेवक म्हणून निवडून येत पिंपरी चिंचवड शहराच्या राजकारणात आपली ठोस छाप उमटवली आहे. शहराध्यक्ष, महापौर, सभागृह नेता आणि स्थायी समिती अध्यक्ष अशा विविध महत्त्वाच्या पदांवर त्यांनी काम करत शहर विकासात सक्रिय भूमिका बजावली आहे.

स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या मते, पक्ष संघटन वाढविणे, महानगरपालिकेत सत्ता स्थापन करणे आणि सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न सोडविणे यामध्ये बहल यांचे योगदान निर्णायक राहिले आहे. त्यामुळे त्यांना विधान परिषदेच्या माध्यमातून प्रतिनिधित्व मिळावे, अशी एकमुखी मागणी करण्यात आली.

या शिष्टमंडळात यावेळी डॉ.वैशाली घोडेकर, हिरानंद उर्फ डब्बू आसवाणी, शाम लांडे, सीमा सावळे, वैशाली काळभोर, अतुल शितोळे, जितेंद्र ननावरे, फजल शेख, संतोष बारणे, राजेंद्र जगताप, प्रकाश सोमवंशी, निकिता कदम, विकास साने, राजू बनसोडे, शेखर चिंचवडे, वर्षा जगताप, उज्वला ढोरे, प्रियंका कुदळे, अरुणा लंगोटे, अश्विनी वाबळे, सारिका मासुळकर, प्रतिक्षा जवळकर-लांघी, दिप्ती कांबळे, ज्ञानेश्वर कांबळे, सारंग कामतेकर, तानाजी खाडे, ज्ञानेश्वर उर्फ माऊली मोरे, रविंद्र ओव्हाळ, युसूफ कुरेशी, दिपक साकोरे, राजू लोखंडे, निलेश शिंदे, अंबरनाथ कांबळे, गणेश लंगोटे, मंगेश बारणे, हबीब शेख, सचिन बारणे, इत्यादींसह अनेक पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

शहराला प्रतिनिधीत्व मिळणे अपेक्षीत…

पिंपरी चिंचवड शहरात तीन विधानसभा मतदारसंघ असून त्यापैकी केवळ एकच आमदार राष्ट्रवादी काँग्रेसकडे आहे. अशा परिस्थितीत शहरातील विकासकामांना गती देण्यासाठी विधान परिषद किंवा महामंडळाच्या माध्यमातून शहराला अधिक प्रभावी प्रतिनिधित्व मिळणे आवश्यक असल्याचेही निवेदनात म्हटले आहे. औद्योगिक नगरी आणि आयटी हब म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पिंपरी चिंचवड शहराच्या विकासाच्या दृष्टीने अनुभवी आणि दीर्घकाळ राजकीय कामाचा अनुभव असलेल्या नेतृत्वाला संधी मिळाल्यास शहराचा विकास अधिक वेगाने होईल, असा विश्वासही शिष्टमंडळाने व्यक्त केला.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button