IPL 2025 Final | ‘ई साला कप नामदे’ रॅपर ड्रेकने RCB वर लावला ६.४१ कोटींचा सट्टा

IPL 2025 Final | कॅनेडियन रॅपर ड्रेकने इंडियन प्रीमियर लीग (IPL) २०२५ च्या फायनल सामन्यासाठी रॉयल चैलेंजर्स बेंगलोर (RCB) वर तब्बल ७५०,००० डॉलर (सुमारे ६.४१ कोटी रुपये) चा सट्टा लावला आहे. RCB आज (३ जून) अहमदाबाद येथे पंजाब किंग्स (PBKS) विरुद्ध आपले पहिले IPL विजेतेपद मिळवण्यासाठी मैदानात उतरणार आहे. ड्रेकच्या या मोठ्या सट्ट्याने सोशल मीडियावर खळबळ उडवली असून, चाहत्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.
ड्रेकने मंगळवारी इन्स्टाग्रामवर एक स्क्रीनशॉट शेअर केला आहे. यामध्ये त्याने स्टेकवर (सट्टा लावण्यासाठीचं संकेतस्थळ) आयपीएल २०२५ च्या अंतिम सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बँगलोर संघावर ७,५०,००० डॉलर्सचा (६,४१,०८,९७४) सट्टा लावल्याची माहिती दिली आहे. त्याने रिसिप्टचा स्क्रीनशॉट देखील शेअर केला आहे. दरम्यान, विराट कोहलीचा संघ या सामन्यात जिंकला तर ड्रेकला १.३१२ मिलियन डॉलर्स म्हणजेच ११,२१,५७,६९७ रुपये मिळतील. त्यामुळे ड्रेकने कॅप्शनमध्ये ‘ई साला कप नामदे’ असं म्हटलं आहे. कॅनडा किंवा अमेरिकेत क्रिकेट फार लोकप्रिय नाही तरीदेखील ड्रेकचा इतका उत्साह आणि सट्ट्यात लावलेली रक्कम पाहून त्याचे जगभरातील चाहते अचंबित झाले आहेत.
IPL २०२५ मध्ये RCB ने दिल्ली कॅपिटल्स, चेन्नई सुपर किंग्स आणि राजस्थान रॉयल्स यांसारख्या बलाढ्य संघांना हरवत अंकतालिकेत अव्वल स्थान मिळवले होते. आजच्या फायनल सामन्यात RCB ची कर्णधार रजत पाटीदार आणि स्टार खेळाडू विराट कोहली यांच्यावर सर्वांच्या नजरा असतील. सामना संध्याकाळी ७:३० वाजता अहमदाबाद येथे सुरू होईल आणि स्टार स्पोर्ट्स नेटवर्क तसेच JioHotstar वर थेट प्रक्षेपित केला जाईल.