Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीक्रिडाताज्या घडामोडी

सेमीफायनल प्रवेशासाठी भारताला उद्या झिम्बाब्वे विरुद्ध किती ओव्हरमध्ये किती धावांनी जिंकावं लागेल?

IND vs ZIM : दक्षिण आफ्रिकेकडून मोठा पराभव झाल्यामुळे टीम इंडियाचा रनरेट (NRR) -3.800 झाला आहे. भारत ज्या गटात आहे, त्याला ग्रुप ऑफ डेथ म्हटलं जातं. कारण या ग्रुपमधील भारतासह अन्य तीन टीम्स झिम्बाब्वे, वेस्ट इंडिज आणि साऊथ आफ्रिका यांनी ग्रुप स्टेजमध्ये एकही सामना गमावला नव्हता.

सेमीफायनल प्रवेशासाठी टीम इंडियाला आता फक्त विजय मिळवून भागणार नाही, तर NRR मध्ये सुद्धा सुधारणा करावी लागेल. त्याशिवाय अन्य टीम्सच्या जय-पराजयावर लक्ष ठेवावं लागेल. कारण टीम्सचे पॉइंट बरोबरीत असतील, तर NRR ची भूमिका महत्वाची ठरणार आहे. टीम इंडियाचा उद्या 26 फेब्रुवारीला सामना झिम्बाब्वे विरुद्ध आहे. या मॅचमध्ये भारताची सर्व रणनिती NRR निगेटीवमधून पॉझिटिव्ह बनवण्याची असेल.

हेही वाचा –  सकाळी रिकाम्या पोटी कोणती फळे खाऊ नयेत, जाणून घ्या आहार तज्ज्ञांकडून

टीम इंडियाला उद्या झिम्बाब्वे विरुद्ध मोठ्या फरकाने विजय मिळवावा लागेल. भारताने पहिली गोलंदाजी स्वीकारली तर झिम्बाब्वेला कमी धावसंख्येवर रोखावं लागेल तसच टार्गेटपर्यंत वेगाने पोहोचावं लागेल. टार्गेट जितकं छोटं असेल तितकं लवकर चेज करण्याची गरज कमी असेल. पण भारताला आक्रमक क्रिकेट खेळावं लागेल.

जर झिम्बाब्वेच्या टीमने 90 धावा केल्या तर भारताला हे टार्गेट फक्त 9 ओव्हरमध्ये गाठावं लागेल. असं केल्यास NRR मोठी सुधारणा होईल. झिम्बाब्वेने 150 धावा केल्या तर टीम इंडियाला 11 ओव्हरमध्ये विजय मिळवावा लागेल. हे कठीण आहे.

पण टॉप ऑर्डरला उद्या तसा खेळ खेळावाच लागेल. झिम्बाब्वेने 180 ते 200 धावा केल्या तर भारताला 12 ते 15 ओव्हरमध्ये मॅच संपवावी लागेल. असं झाल्यास भारताच्या नेट रनरेटमध्ये मोठी सुधारणा होईल. टार्गेट जितकं मोठं रिक्वायर्ड रन रेटही तितका जास्त असेल.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button