ताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

पिंपरी-चिंचवडमध्ये विशेष सघन मतदार यादी पुनरीक्षण मोहिमेला गती!

सोसायट्यांनी BLO ला सहकार्य करण्याचे PCCHSFचे आवाहन

– वेळेत पडताळणी न झाल्यास मतदार यादीतून नाव वगळले जाण्याची शक्यता

पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी

विशेष सघन मतदार यादी पुनरीक्षण (Special Intensive Revision – SIR) २०२६ मोहिमेअंतर्गत प्रत्येक पात्र मतदाराने वेळेत पडताळणी पूर्ण करणे अत्यावश्यक असल्याचे स्पष्ट करत पिंपरी-चिंचवड को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटीज फेडरेशन (PCCHSF) ने सर्व सहकारी गृहनिर्माण संस्थांचे अध्यक्ष, सचिव आणि व्यवस्थापन समित्यांना निवडणूक आयोगाच्या Booth Level Officer (BLO) यांना पूर्ण सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.

महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोग, पिंपरी-चिंचवड निवडणूक प्रशासन आणि जिल्हा उपनिबंधक (सहकारी संस्था) यांच्या समन्वयाने ३० जून रोजी झालेल्या अधिकृत बैठकीला PCCHSF चे प्रतिनिधी उपस्थित होते. यावेळी निवडणूक अधिकाऱ्यांनी SIR ही कायदेशीर आणि वेळबद्ध प्रक्रिया असल्याचे स्पष्ट करत प्रत्येक नोंदणीकृत मतदाराने निर्धारित कालावधीत पडताळणी पूर्ण करणे आवश्यक असल्याचे सांगितले.

Pre-SIR प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर ३० जून ते २९ जुलै २०२६ या कालावधीत BLO मार्फत घराघर जाऊन मतदार पडताळणी सुरू झाली आहे. प्रत्येक घराला भेट देऊन मतदारांची माहिती पडताळली जाणार असून, सोसायटी व्यवस्थापनाने BLO अधिकाऱ्यांना प्रवेश देऊन पडताळणी प्रक्रिया सुलभ करावी, तसेच रहिवाशांना आवश्यक कागदपत्रांसह उपलब्ध राहण्याबाबत पूर्वसूचना द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

निवडणूक प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, पहिल्या भेटीत मतदार उपलब्ध नसल्यास BLO अधिकाऱ्यांकडून जास्तीत जास्त तीन वेळा भेट दिली जाऊ शकते. प्रत्येक भेटीची अधिकृत नोंद, पुरावे आणि पंचनामा तयार केला जाणार आहे. तीनही भेटीनंतरही पडताळणी पूर्ण न झाल्यास निवडणूक आयोगाच्या नियमानुसार संबंधित मतदाराचे नाव मतदार यादीतून वगळले जाण्याची शक्यता असल्याचे बैठकीत स्पष्ट करण्यात आले.

हेही वाचा –  स्वरसम्राज्ञी आशा भोसले संगीत जीवन गौरव पुरस्काराची घोषणा

दरम्यान, पात्र मतदारांनी घरपोच पडताळणीबरोबरच Election Commission of India (ECI) च्या Voter Portal वरूनही ऑनलाइन पडताळणी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

अधिकृत वेळापत्रकानुसार २९ जुलैपर्यंत घरपोच पडताळणी आणि मतदान केंद्रांचे पुनर्संरचना, ५ ऑगस्ट रोजी मसुदा मतदार यादी प्रसिद्ध होणार असून, ५ ऑगस्ट ते ३ ऑक्टोबरदरम्यान दावे व हरकती स्वीकारल्या जाणार आहेत. अंतिम मतदार यादी ७ ऑक्टोबर २०२६ रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे.

PCCHSF ने सर्व सहकारी गृहनिर्माण संस्था, पदाधिकारी आणि नागरिकांना लोकशाही प्रक्रियेत सक्रिय सहभाग नोंदवत वेळेत SIR पडताळणी पूर्ण करण्याचे आवाहन केले असून, प्रत्येक पात्र नागरिकाचा मतदानाचा हक्क अबाधित ठेवण्यासाठी निवडणूक आयोगाला संपूर्ण सहकार्य करण्याचे आवाहनही केले आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

“मतदानाचा हक्क हा प्रत्येक नागरिकाचा मूलभूत लोकशाही अधिकार आहे. त्यामुळे प्रत्येक पात्र मतदाराने २९ जुलैपूर्वी SIR पडताळणी पूर्ण करावी. सर्व सोसायट्यांनी BLO अधिकाऱ्यांना आवश्यक सहकार्य करून ही प्रक्रिया सुरळीत पार पाडावी. वेळेवर केलेली पडताळणी प्रत्येक नागरिकाचा मतदानाचा हक्क सुरक्षित ठेवेल आणि लोकशाही अधिक सक्षम करण्यास हातभार लावेल.”

– सचिन लोंढे (अध्यक्ष, पिंपरी-चिंचवड को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटीज फेडरेशन)

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button