Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीआरोग्य । लाईफस्टाईलताज्या घडामोडी

सकाळी रिकाम्या पोटी कोणती फळे खाऊ नयेत, जाणून घ्या आहार तज्ज्ञांकडून

Health :  तंदुरस्त आरोग्यासाठी फळांचे सेवन करणे हे अनेक फायद्याचे आहेत. प्रत्येकाने आपल्या आहारात काही फळांचा समावेश केला पाहिजे. ज्यामुळे आपले आरोग्य आणि शरीर निरोगी राहते. पण फळं सेवन करण्याची एक विशिष्ट वेळ देखील असते. काही लोकं रात्री फळे खातात, तर काही लोकं सकाळी रिकाम्या पोटी फळांचे सेवन करणे आरोग्यदायी मानतात. त्यातच असे काही फळे आहेत जी आरोग्यदायी आहेत मात्र सकाळी रिकाम्या पोटी त्यांचे सेवन करणे टाळावे. चला तर मग आजच्या लेखात आहारतज्ञांकडून अधिक जाणून घेऊयात.

आहारतज्ज्ञ सांगतात की सकाळी रिकाम्या पोटी फळं खाऊ शकतात, परंतु काही अशी फळं आहेत जी कधीही रिकाम्या पोटी खाऊ नयेत. कारण ही फळे फायद्याऐवजी तुमच्या आरोग्याचे नुकसान करू शकतात. सकाळी खाल्ल्याने ॲसिडिटी आणि गॅस होऊ शकतो. काही लोकांना पचनाच्या समस्या निर्माण होऊ शकतात.

आहार तज्ञ सांगतात की सकाळी रिकाम्या पोटी लिंबूवर्गीय फळे खाणे टाळण्याचा सल्ला देतात. संत्र्यांसारख्या लिंबूवर्गीय फळांमध्ये सायट्रिक अॅसिडचे प्रमाण जास्त असते. यामुळे पोटातील आम्ल वाढू शकते, ज्यामुळे अपचनापासून ते गॅस आणि ॲसिडिटीपर्यंतच्या समस्या उद्भवू शकतात. ज्यांना आधीच पोटाच्या समस्या आहेत त्यांनी विशेष काळजी घ्यावी. लिंबूवर्गीय फळे खाल्ल्याने अशा व्यक्तींना पचनाच्या समस्या वाढू शकतात.

हेही वाचा –  ‘पात्र रुग्णालयांना जनआरोग्य योजना बंधनकारक’; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा विधानसभेत इशारा

केळी

केळी खूप ऊर्जा देणारे फळं असले तरी जेवणानंतर काही तासांनी ती खावीत. रिकाम्या पोटी केळी कधीही खाऊ नका. कारण केळीमध्ये असलेले मॅग्नेशियम आणि नैसर्गिक साखर शरीरात असंतुलन निर्माण करू शकते.

केळी खाल्ल्याने रक्तातील साखरेची पातळीही झपाट्याने वाढू शकते. त्याचप्रमाणे आंबा हा फळ देखील कधीही रिकाम्या पोटी खाऊ नयेत. आंब्यामध्ये साखर असते. विशेषतः मधुमेहींसाठी रिकाम्या पोटी आंबे खाल्ल्याने रक्तातील साखरेची पातळी झपाट्याने वाढू शकते.

फळे खाण्याची योग्य पद्धत कोणती?

-रिकाम्या पोटी लिंबूवर्गीय फळे खाऊ नका

-फळांसोबत दूध पिणे टाळा.

-फळे नेहमी बारीक करून खावीत.

-कापलेली फळे जास्त वेळ ठेऊन खाऊ नका.

( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button