पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारतासाठी पदक जिंकणाऱ्यांसाठी उद्योगपती सज्जन जिंदाल यांची मोठी घोषणा!
Sajjan Jindal | फ्रान्समधील पॅरिस या शहरात ऑलिम्पिक 2024 ही स्पर्धा खेळली जात आहे. आज या स्पर्धेचा सहावा दिवस आहे. यामध्ये आत्तापर्यंत भारताने तीन पदके जिंकली आहे. भारताकडून मनू भाकरे, सरबज्योत सिंग आणि स्वप्नील कुसाळे यांनी नेमबाजीत कांस्यपदक जिंकले आहे. आता या खेळाडुंसाठी उद्योगपती आणि जेएसडब्ल्यू समूहाचे अध्यक्ष सज्जन जिंदाल यांनी एक नवीन लक्झरी कार भेट देण्यार असल्याची घोषणा केली आहे.
सज्जन जिंदाल यांनी त्यांच्या एक्स पोस्टमध्ये लिहिले की, टीम इंडियाच्या प्रत्येक ऑलिम्पिक पदक विजेत्याला जेएसडब्ल्यू एमजी इंडियाकडून एक आलिशान एमजी विंडसर कार भेट दिली जाईल. हे जाहीर करताना खूप आनंद होत आहे! आमचे सर्वोत्तम खेळाडू त्यांच्या समर्पण आणि यशासाठी सर्वोत्तम पुरस्कारासाठी पात्र आहेत, असं त्यांनी म्हटलं आहे. त्यांच्या या निर्णयाचे संपुर्ण देश कौतुक करत आहे.
हेही वाचा – बोऱ्हाडेवाडी, मोशीतील वुड्सविले सोसायटीचा रस्ता होणार ‘चकाचक’
मॉरिस गॅरेजेस इंडियाने जेएसडब्ल्यू समूहाच्या सहकार्याने भारतात आपले नवीन सीयूव्ही एमजी विंडसर लाँच करण्याची घोषणा केली होती. यूके मध्ये 1924 मध्ये स्थापित एमजी आधारित कंपनीने म्हटले आहे की, ही कार विंसडर कॅसल म्हणजेच ब्रिटनच्या शाही राजवाड्याच्या वास्तुकलापासून प्रेरित आहे.