Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीक्रिडाताज्या घडामोडी

IPL 2026 : विजयानंतरही RCB ला मोठा झटका; पंचांशी हुज्जत घालणे मुख्य प्रशिक्षकांना पडले महागात

RCBvMI | रजत पाटीदारच्या नेतृत्वाखालील रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने (RCB) मुंबई इंडियन्सवर २ विकेट्सने थरारक विजय मिळवला असला, तरी या विजयाचा आनंद शिस्तीच्या कारवाईमुळे काहीसा विरळ झाला आहे. पंचांशी हुज्जत घातल्याप्रकरणी आरसीबीचे मुख्य प्रशिक्षक अँडी फ्लॉवर यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात आली असून त्यांच्या सामना शुल्कात १५ टक्क्यांची कपात करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, आयपीएल २०२६ च्या हंगामात एखाद्या प्रशिक्षकाला शिक्षा होण्याची ही पहिलीच वेळ आहे.

नेमकं प्रकरण काय?

आरसीबीच्या डावातील १८ व्या षटकात हा संपूर्ण वाद घडला. मुंबईचा गोलंदाज अल्लाह गझनफरच्या चेंडूवर कृणाल पांड्याने लाँग-ऑनच्या दिशेने फटका मारला होता. तिथे क्षेत्ररक्षण करणाऱ्या नमन धीरने सीमारेषेवर चेंडू अडवण्याचा प्रयत्न केला. यावेळी नमनचा बूट सीमारेषेच्या कुशनला लागला असून तो षटकार देण्यात यावा, अशी मागणी अँडी फ्लॉवर यांनी लावून धरली. मात्र, रिप्लेमध्ये नमनचा कुशनला स्पर्श झाला नसल्याचे स्पष्ट झाले. या निर्णयावरून चिडलेल्या फ्लॉवर यांचा चौथ्या पंचांशी जोरदार वाद झाला.

हेही वाचा

जनतेसाठी काटकसर, पण साहेबांसाठी लवाजमा का? अंजली दमानियांनी पंतप्रधानांना सुनावले

आचारसंहितेचे उल्लंघन आणि दंड

अँडी फ्लॉवर यांचा पंचांशी रागाने बोलतानाचा व्हिडिओ समोर आल्यानंतर आयपीएल प्रशासनाने याची गंभीर दखल घेतली. आयपीएल आचारसंहितेच्या कलम २.३ अंतर्गत त्यांना दोषी ठरवण्यात आले आहे. सामनाधिकारी अमित शर्मा यांनी ही शिक्षा सुनावली असून फ्लॉवर यांनी आपला गुन्हा कबूल केला आहे. लेव्हल १ च्या नियमानुसार ही शिक्षा अंतिम आणि बंधनकारक आहे.

आरसीबीचा प्लेऑफकडे प्रवास, मुंबई स्पर्धेबाहेर

या विजयामुळे आरसीबीचा संघ १४ गुणांसह आणि सरस धावगतीच्या जोरावर गुणतालिकेत अव्वल स्थानी पोहोचला आहे. आता प्लेऑफमध्ये अधिकृत प्रवेश निश्चित करण्यासाठी त्यांना केवळ एका विजयाची गरज आहे. दुसरीकडे, या पराभवामुळे मुंबई इंडियन्सचे या हंगामातील आव्हान संपुष्टात आले असून त्यांचा संघ स्पर्धेबाहेर झाला आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button