breaking-newsताज्या घडामोडीपुणे

महिनाभरात ३५ हजार बेशिस्तांवर कारवाई; वाहतूक शाखा पोलीस उपायुक्त अमोल झेंडे यांची माहिती

पुणे : वाहतूक नियम धुडकाविणाऱ्या बेशिस्तांवर वाहतूक पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला आहे. आतापर्यंत पोलिसांनी नियमभंग करणाऱ्या ३५ हजारांंहून जास्त वाहन चालकांविरुद्ध कारवाई केली आहे. नोव्हेंबरअखेरीपर्यंत ३० हजार ९२७ चालकांविरुद्ध कारवाई करण्यात आली आहे. ट्रिपल सीट वाहन चालविणाऱ्या तीन हजार ३४१, तर ६३४ मद्यपि चालकांविरुद्ध कारवाई झाली असल्याचे वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त अमोल झेंडे यांनी सांगितले.

शहरात गंभीर स्वरूपाच्या अपघाताचे प्रमाण जास्त आहे. वाहतूक पोलीस दिवसभरात दोन सत्रांत काम करतात. वाहतूक शाखेतील ८५० पोलीस कर्मचारी दोन सत्रांत विविध चौकांत वाहतूक नियमन करतात. वाहनचालकांच्या बेदरकारपणामुळे गंभीर अपघात घडतात. बेशिस्त वाहनचालकांमुळे कोंडीत भर पडते. शहरात दररोज दोन ते तीन गंभीर अपघात घडतात, असे निरीक्षण वाहतूक पोलिसांनी नोंदविले आहे.

हेही वाचा     –      दिल्लीत अमित शाह आणि विनोद तावडेंमध्ये मुख्यमंत्रीपदाबाबत चर्चा 

विरुद्ध दिशेने वाहन चालविणे, मोबाइलवर संभाषण, एका दुचाकीवरून तिघांचा प्रवास (ट्रिपल सीट), मद्य पिऊन वाहन चालविणे, मोटार चालविताना आसनपट्टा (सीट बेल्ट) न लावणे अशा प्रकारचे नियमभंग सर्रास केले जातात. बेशिस्त वाहनचालकांविरुद्ध कारवाईचा, तसेच संबंधिताचे वाहन सहा महिन्यांसाठी जप्त करण्यात येईल.

– अमितेश कुमार, पोलीस आयुक्त

मद्य पिऊन वाहन चालविणाऱ्या अडीच हजार जणांंविरुद्ध कारवाई करण्यात आली असून, पहिल्या टप्प्यात ५०० जणांचा वाहतूक परवाना निलंबित करण्याचा प्रस्ताव वाहतूक पोलिसांनी प्रादेशिक परिवहन विभागाकडे पाठविला आहे. परवाना किमान सहा महिन्यांंपर्यंत निलंबित होणार असल्याने त्यांना वाहन चालविण्यास बंदी असणार आहे.

– अमोल झेंडे, पोलीस उपायुक्त, वाहतूक शाखा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button