अर्जुन तेंडुलकर कोल्हापूरच्या दत्त महाराजांच्या दर्शनाला
अर्जूनच्या फिटनेसवर चर्चा
कोल्हापूर : आयपीएल २०२४ मध्ये मुंबईची कामगिरी अत्यंत लाजिरवाणी राहिली आहे. पाच वेळा विजेत्या राहिलेल्या मुंबईला यंदा प्लेऑफमध्ये सुध्दा आपली जागा बनवता आली नाही. याच वेळी मुंबई इंडियन्स संघाचा भाग असलेल्या अर्जुन तेंडुलकरला यंदाच्या मौसमातही खेळायला संधी मिळाली नसून अगदी शेवटच्या सामन्यात त्याला पाहला मिळाले. मात्र केवळ २ षटक टाकत दुखापतीमुळे त्याला मैदानाच्या बाहेर जावे लागले. या पराभवानंतर आता सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकर कोल्हापूरच्या नृसिंहवाडीत दिसला.
अर्जुनची दुखापत
यंदाच्या आयपीएलमध्ये मुंबईच्या शेवटच्या सामन्यात अर्जुनला खेळण्याची संधी मिळाली होती. त्याच्या कामगिरीत आधीपेक्षा सुधार तर पाहायला मिळालाच पण त्याच्या फिटनेसची प्रचिती ही सर्वांना आली. केवळ २ षटक टाकल्यानंतर हॅमस्ट्रिंगच्या दुखापतीमुळे त्याला पेव्हेलियनमध्ये परतावे लागले. यानंतर अर्जूनच्या फिटनेसवर प्रचंड चर्चा झाली. तो आपली कामगिरी कशी सुधारेल यावर बऱ्याच जणांनी प्रश्न निर्माण केले. यानंतर आता अर्जुन २१ मे ला कोल्हापूरला दत्त महाराजांच्या दर्शनाला नृसिंहवाडी इथं पोहचला आहे.
दत्त महाराजांचा घेतला आशीर्वाद
कोल्हापूरच्या नृसिंहवाडीतील दत्त महाराजांवर तेंडुलकर कुटुंबियांची प्रचंड श्रद्धा आहे. हे या आधी ही आपल्याला पाहयला मिळाले आहे. मास्टर ब्लास्टर आणि त्याचा मुलगा अर्जुन तेंडुलकर या पिता-पुत्र यांची जोडी या आधी ही इथे दर्शनाला आली होती मात्र यावेळस अर्जुन एकटाच दिसला. तेंडुलकर कुटुंबिय या पूर्वी ही कोल्हापूरच्या दत्त महाराजांच्या दर्शनास आलेले आपल्याला पाहला मिळाले असून कोणत्याही चांगल्या कामाला सुरवात करण्याआधी हे इथे भेट देतात. मात्र अर्जुनने दत्त महाराजांच्या दर्शनाला तातडीने पोहण्या मागचे कारण अद्याप ही स्पष्ट झालेले नाही.