breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

माजी नगरसेवक शांताराम भालेकर यांच्या वाढदिवसानिमित्त इलेक्ट्रॉनिक वस्तूंवर सूट!

तळवडेतील जीआय इलेक्ट्रॉनिक्सची धमाका ऑफर

पिंपरी : आमदार महेश लांडगे यांच्या विशेष सहकार्याने व माजी नगरसेवक शांताराम बाप्पू भालेकर यांच्या वाढदिवसानिमित्त दि. २८ जानेवारी ते १० फेब्रुवारीपर्यंत त्रिवेणीनगर चौक, तळवडेमधील जीआय- इलेक्ट्रॉनिक्स अँड कंपनीच्या सर्व प्रॉडक्ट्सवर ७०% पर्यंत दरात सूट मिळणार आहे. त्यामध्ये स्मार्ट टीव्ही, घरगुती आटा चक्की, वॉटर प्युरिफायर, कुलर व इत्यादी प्रॉडक्ट्स उपलब्ध आहेत.

हेही वाचा  – पुढच्या ७ दिवसांत देशात CAA लागू होणार? केंद्रीय मंत्र्यांच्या दाव्यानंतर चर्चांना उधाण

जीआय इलेक्ट्रॉनिक्स अँड कंपनीचे उद्घाटन टाटा मोटर्स युनियन लीडर सचिन लांडगे, माजी नगरसेवक शांताराम बाप्पू भालेकर, माजी नगरसेविक अरुणा भालेकर, माजी नगरसेविक कमल घोलप, माजी स्वीकृत नगरसेवक पांडुरंग भालेकर, युवा नेते निलेश भालेकर, उद्योजक बापू घोलप, सामाजिक कार्यकर्ते दादा कवितके, ह.भ.प. आव्हाड महाराज व इतर मान्यवर यांच्या हस्ते करण्यात आले.

याप्रसंगी ज्येष्ठ नागरिक, पदाधिकारी, प्रभाग क्रमांक १२ मधील सर्व बंधू-भगिनी व नागरिक उपस्थित होते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button