breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

दिनेश यादव यांच्या संकल्पनेतून साकारण्यात आलेल्या विसर्जन रथाला उत्स्फुर्त प्रतिसाद

पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी | भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा व भोसरीचे आमदार महेश लांडगे युवा मंच.स्वी सदस्य दिनेश यादव यांच्या संकल्पनेतून सुरु करण्यात आलेल्या गणेशमूर्ती दान आणि विसर्जन रथाला गणेश भक्तांनी उत्स्फुर्तपणे प्रतिसाद दिला आहे.

पर्यावरणपूरक पद्धतीने बाप्पाला निरोप देण्यासाठी असंख्य भाविकांनी पुढाकार घेतल्याचे या निमित्ताने पाहायला मिळाले.

पिंपरी-चिंचवड महापालिकेने सर्व गणेश भक्तांना पर्यावरण पूरक गणेशोत्सव साजरा करण्याचे आवाहन केले होते. त्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देत आणि प्रभागातील गणेश भक्तांच्या भावना लक्षात घेत भाजपा स्वी सदस्य दिनेश यादव यांनी गणेश मूर्ती दान व विसर्जन रथ ही संकल्पना राबवली.

महापालिकेच्या वतीने कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी विसर्जन घाटावर गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यास बंदी घालण्यात आली आहे.

परंतु, मागील पाच दिवसांपासून घराघरात व सार्वजनिक गणेशोत्सव मंडळामध्ये चैतन्याचे रूप घेऊन विराजमान झालेल्या गणरायाचे विसर्जन कसे करावे, यावरून नागरिकांच्या मनामध्ये संभ्रम निर्माण झाला होता. या पार्श्वभूमीवर स्वी सदस्य दिनेश यादव यांनी सुरू केलेल्या उपक्रमामध्ये भाविकांनी उत्स्फूर्तपणे मूर्तिदान व विसर्जन रथामध्ये विसर्जन केले.

त्यामुळे पर्यावरण पूरक उत्सवाचे बीज रुजल्याचे चित्र दिसून आले. दिनेश यादव यांनी सुरू केलेल्या या रथाचे प्रभागातील महिला आणि गणेश भक्तांनी स्वागत केले. तसेच अनेकांनी विसर्जन रथामध्ये आपल्या बाप्पाचे विसर्जन केले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button