breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

बुलेट चोराणारा सराईत गजाआड; युनिट दोनच्या पथकाची कामगिरी

पिंपरी, (महा-ई-न्यूज) – काळेवाडीत बहिणीला भेटण्यासाठी आलेल्या सराईत बुलेट (दुचाकी) चोराला पोलिसांनी ताब्यात घेतले. पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखा युनिट दोनच्या पथकाने सापळा रचून ही कारवाई केली.

तुषार भगवान अंबिलढगे (वय 19, रा. चिंचपूर पांगुळ, ता. पाथर्डी, जि. अहमदनगर) असे अटक आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुन्हे शाखा युनिट दोनचे पथकातील पोलीस नाईक मोहम्मद गौस नदाफ यांना एक बुलेटचोर काळेवाडीत धनगरबाबा मंदिराजवळ बहिणीला भेटण्यासाठी येणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी धनगरबाबा मंदिर परिसरात सापळा रचून तुषारला ताब्यात घेतले. त्याच्याकडे असलेल्या बुलेट (एमएच 11 / सीएन 5491) बाबत चौकशी केली. ती चोरीची असल्याचे समजले. त्यावरून त्याला अटक करण्यात आली. बुलेटबाबत वाकड पोलीस ठाण्यात वाहनचोरीचा गुन्हा दाखल आहे. आरोपी तुषार यापूर्वी वाहन चोरीच्या गुन्ह्यात अटक करून त्याच्याकडून 22 रॉयल इन्फिल्ड बुलेट मोटार सायकल जप्त केल्याचे सिध्द झाले.

पोलीस आयुक्त आर. के. पद्मनाभन, अप्पर पोलीस आयुक्त मकरंद रानडे, सहाय्यक पोलीस आयुक्त सतीश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुधाकर काटे, सहाय्यक पोलीस निरीक्षक सतीश कांबळे, सहाय्यक पोलीस फौजदार निकम, पोलीस कर्मचारी नदाफ, मुल्ला, आढारी, तांबोळी यांच्या पथकाने ही कामगिरी केली आहे. सहाय्य्क पोलीस निरीक्षक सतीश कांबळे तपास करीत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button