breaking-newsताज्या घडामोडीराजकारणराष्ट्रिय

भारतीय नौदलासाठी आणखी सहा पाणबुड्या; ४३ हजार कोटींचा प्रकल्प

  • ४३ हजार कोटींचा प्रकल्प

नौदलासाठी देशी बनावटीच्या सहा पारंपरिक सहा पाणबुड्यांची बांधणी करण्याच्या ४३ हजार कोटी रुपयांच्या महाप्रकल्पाला शुक्रवारी संरक्षण मंत्रालयाने मान्यता दिली. चीन आपल्या सागरी क्षमतेमध्ये वाढ करीत असल्याच्या पार्श्वभूमीवर नौदलाचे धैर्य वाढविण्याच्या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आला आहे.

संरक्षण क्षेत्रातील परदेशी कंपन्यांसमवेत देशी संरक्षण उत्पादकांची सामरिक भागीदारी असावी याबाबत चर्चा सुरू होती त्यानुसार या पाणबुड्यांची बांधणी करण्यात येणार आहे आणि त्यामुळे आयातीवर अवलंबून राहण्याचे प्रमाण कमी होणार आहे, असे सूत्रांनी सांगितले. या महाप्रकल्पाचे ‘पी-७५ इंडिया’ असे नामकरण करण्यात आले असून त्याला संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या संरक्षण संपादन परिषदेच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. या प्रकल्पाची अंमलबजावणी १२ वर्षांत केली जाणार आहे. लार्सन अ‍ॅण्ड टुब्रो आणि माझगाव डॉक लि.ला विनंतीप्रस्ताव दिला जाणार आहे. भारतीय नौदलाची २४ नव्या पाणबुड्या घेण्याची योजना आहे. सध्या नौदलाकडे १५ पारंपरिक आणि दोन आण्विक पाणबुड्या आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button