breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

ह्रदयाबरोबरच संपूर्ण शरीराची तपासणी करणे आवश्यक – डॉ. सुनील अग्रवाल

पिंपरी / महाईन्यूज

कोरोनाच्या महामारीने देशात थैमान माचवले आहे.त्यामुळे सर्वांंचे जनजीवन शैली विस्कळीत झाली आहे. अनेक कारणामुळे  सर्वांंचे स्ट्रेस वाढल्याने याचा परिणाम संपुर्ण शरीरावर होत आहे. त्यामुळे सध्या लवकरात लवकर ह्रदयाबरोबरच संपूर्ण शरीराची तपासणी करणे आवश्यक असल्याची मत ओम हॉस्पीटलचे संचालक हार्ट स्पेशलिस्ट डॉ. सुनील अग्रवाल यांनी व्यक्त केले आहे.

ते पुढे म्हणाले कि अनेक वेळा रूग्णांवर दुर्लक्ष झाल्यामुळे आपातकालिन स्थिती निर्माण होते. कोरोनाबाधित रूग्णांमध्ये असामान्य ह्रदयगती, ह्रदयाचे ठोके वाढणे, छातीत दुखणे, आणि थकवा  येणे यासारखे लक्षणे वारंवार दिसतात. अनेक वर्षापासुन ह्रदयाचा त्रास असणार्‍या व्यक्तींची रोगप्रतिकार शक्ती खुपच कमी झालेली असते. यामुळे स्वत:ची काळजी घेतले पाहिजे. कोरोनामुळे सर्वांचा  मानसिक तनाव वाढल्याने याचा परिणाम संपुर्ण शरीरावर पडत आहे. त्यामुळे सध्याच्या काळात हेल्थ चेकअप करणे गरजेचे आहे, तसेच कोरोनामुळे हृदयरोगींना अधिक धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे आपल्या हृदयाची तपासणी करणे फार गरजेचे आहे.

हेल्थ चेकअपमुळे वेळीच उपचार करता येईल आणि स्वस्थ शरीराचे जीवन जगता येईल. हृदया बरोबरच ब्लडशुगर, युरीन, हिमोग्राम, ईसीजी, 2 डीको व इतर चाचण्या करण्याची विशेष सोय भोसरी येथील मल्टीस्पेशलिटी, सुपरस्पेशलिटी ओम हॉस्पीटल येथे नाममात्र शुल्कात करण्यात आली आहे. अ‍ॅन्जिओग्राफी फक्त पांच हजारात तर आवश्यक असल्यास अ‍ॅन्जिओप्लास्टी मोफत केली जाईल अशी माहिती डॉ. अशोक अग्रवाल यांनी दिली आहे.अमेरिकन कॉलेज ऑफ कार्डियोलॉजिस्ट च्या फॅलोशिप ने सन्मानित डॉ.सुनील अग्रवाल यांना जगभरात होणार्‍या प्रगत उपचार व तंत्रज्ञान त्वरीत उपलब्ध होत असते आणि त्याचा फायदा सर्व रूगणांना होतो. हेल्थ चेकअप मुळे वेळीच उपचार करता येईल  आणि स्वस्थ शरीराचे जीवन जगता येईल. आज कुठला ही आजार न परवडणारा आहे.

सर्व आजारांवरचे उपचार दिवसेंदिवस खूपच महाग होत चालले आहे. तसेच कोरोना काळातील परिस्थिती पाहता सर्वांचे जीवन सुरक्षित व्हावे या उद्देशाने समाजिक बाधिलकी जपत भोसरी येथील ओम हॉस्पिटल येथे नाममात्र शुल्का हेल्थचेकअपचा उपक्रम सुरु केला आहे. उल्लेखनीय आहे कि ओम हॉस्पीटल मध्ये विविध आजारांवर औषधोपचार केले जातात. निरनिराळ्या आजारांसाठी व शस्त्रक्रियांसाठी सर्व प्रकारचे तज्ञ व अनुभवी डॉक्टर्स, सक्षम निदान सेवा, गुणवंत स्टाफ, अत्याधुनिक उपकरणाने उपचार होत आहे. एकाच छताखाली सर्व प्रकारची वैद्यकीय सेवा उपलब्ध आहे. 24 तास तातडीची व तत्पर सेवा, कॅथ लॅब, कार्डीओलॉजी शस्त्रक्रिया, दुर्बीणी द्वारे सर्व शस्त्रक्रिया, लॅपरोस्कोपिक व एन्डोस्कोपिक शस्त्रक्रिया, अत्याधुनिक अस्थिरोग शस्त्रक्रिया, अतिदक्षता विभागाची सेवा दिली जाते. त्याचप्रमाणे प्रत्येक क्षेत्रातील अनुभवी व नामांकित डॉक्टर उपलब्ध आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button