breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

धक्कादायक! बॉयलरचा स्फोट होऊन शेजारच्या कंपनीतील कामगाराचा मृत्यू , दोन जण गंभीर

मुंबई |

वसईत एका इंजिनिअरिंग कंपनीत बॉयलरचा स्फोट झाला आणि लगतच्या भितींला भगदाड पडून, शेजारी कंपनीत काम करत असलेल्या एका कामगाराचा मृत्यू झाला, तर अन्य दोन कामगार जखमी झाल्याची घटना घडली आहे. शनिवारी दुपारी ३ वाजेच्या सुमारास मुंबई अहमदाबाद महामार्गावर असलेल्या हेफ्ट इंजिनीअरिंग कंपनीत उच्च दाबाने बॉयलरचा स्फोट झाला.

हा स्फोट इतका मोठा होता की, त्यामुळे कंपनीच्या सामुहीक भिंतीला मोठे भगदाड पडले आणि शेजारी काम करत असलेल्या एका कामगाराचा त्यामध्ये मृत्यू झाला. तर अन्य दोन कामगार गंभीर जखमी झाले. स्फोट झालेल्या कंपनीच्या शेजारी असलेल्या डॉल्फिन कंपनीतील १८ वर्षीय कर्मचारी नेमुद्दीन मोहम्मद करीम सलमानी याचा मृत्यू झाला असून, अनवर सिद्बिकी व विनोद यादव हे दोन कामगार जखमी झाले आहेत. वालीव पोलिसांनी याबाबत हेफ्ट इंजिनिरींग कंपनीच्या मालकाविरोधात निष्काळजीपणाचा गुन्हा दाखल केला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button