TOP Newsआरोग्यताज्या घडामोडीपश्चिम महाराष्ट्रपिंपरी / चिंचवडपुणे

गेल्या 24 तासांत 39,070 नवे कोरोना रुग्ण, 43,910 जणांना डिस्चार्ज

पुणे | भारतात गेल्या 24 तासांत 39 हजार 070 नव्या रुग्णांची वाढ झाली असून, गेल्या 24 तासांत 43 हजार 910 बरे झालेल्या रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. देशातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 3 कोटी 19 लाख 34 हजार 455 एवढी झाली आहे.

आरोग्य मंत्रालयाच्या हवाल्याने एएनआयने याबाबत आकडेवारी प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार, देशातील एकूण कोरोना रुग्णांपैकी 3 कोटी 10 लाख 99 हजार 771 रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत. देशात सध्या 4 लाख 06 हजार 822 सक्रिय कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

भारतात आजवर 4 लाख 27 हजार 862 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. गेल्या 24 तासांत देशभरात 491 रुग्ण कोरोनामुळे मृत्यूमुखी पडले आहेत. देशाचा कोरोना मृत्यूदर 1.34 टक्के एवढा आहे तर, रिकव्हरी रेट 97.36 टक्के एवढा आहे. तसेच, देशाचा दैनंदिन आणि आठवड्याचा पॉझिटिव्हीटी रेट पाच टक्क्यांपेक्षा कमी असून दैनंदिन 2.21 टक्के एवढा आहे.

देशात आजवर 48 कोटी 39 हजार 185 चाचण्या पूर्ण झाल्या आहेत तर, गेल्या 24 तासांत 17 लाख 22 हजार 221 नमूने तपासण्यात आले आहेत. आयसीएमआरने याबाबत आकडेवारी प्रसिद्ध केली आहे.

केंद्रीय आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, 50 कोटी 68 लाख 10 हजार 492 नागरिकांना कोरोना प्रतिबंधक लस घेतली आहे. गेल्या 24 तासांत देशभरात 55 लाख 91 हजार 657 जणांचे लसीकरण करण्यात आले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button