breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

पंकजा मुंडे यांना शिवसेनेचा सूचक इशारा

मुंबई |

विधानसभा निवडणुकीतील पराभवातंर विधान परिषदेवर पक्षाने संधी नाकारल्यावर नाके मुरडणाऱ्या व पक्षाला आव्हान देण्याचा प्रयत्न करणाऱ्या पंकजा मुंडे यांना मंत्रिमंडळ विस्तारात भाजपने सूचक इशारा दिला आहे. वंजारी समाजाच्या मतपेढीच्या आधारे स्वत: चे राजकीय वजन वाढविण्याचा प्रयत्न करणाऱ्या पंकजा मुंडे यांचे पंख कापण्याचा पद्धतशीर प्रयत्न भाजपने के ला आहे.

वंजारी समाजातील डॉ. भागवत कराड यांना आधी राज्यसभेची खासदारकी व आता मंत्रिमंडळात समावेश, रमेश कराड यांना विधान परिषदेची आमदारकी देऊन पंकजा याच के वळ समाजाच्या नेत्या नाहीत हे भाजपने अधोरेखित के ले. पंकजा यांच्याकडे पक्षाचे राष्ट्रीय सचिवपद सोपविण्यात आले असले तरी पक्षाला आव्हान देण्याचा प्रयत्न सहन के ला जाणार नाही हाच संदेश त्यांना देण्यात आला आहे. कोकणातील माणसाची नाळ शिवसेनेशी जोडली गेलेली आहे. सरडय़ासारखे कोणी रंग बदलले म्हणजे कोकणी माणूस आपला रंग बदलेल असे नव्हे तर तो शिवसेनेसोबतच कायम राहील. कोंडी कोणाची झाली होती म्हणून भाजपमध्ये प्रवेश करावा लागला, कोंडी झाली म्हणूनच निवडणुकीत पराभव झाले का?

                               – अरविंद सावंत, मुख्य प्रवक्ते शिवसेना

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button