breaking-newsआंतरराष्टीयताज्या घडामोडी

#CoronaVirus | जगात कोरोनाबाधितांची संख्या २९ लाखांवर

नवी दिल्ली | जगात कोरोनाचा कहर सुरु असताना दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची वाढती धक्कादायक आकडेवारी समोर येत आहे. जगभरात कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचा आकडा 2 लाख 5 हजार 965वर पोहचला आहे. तर जगात आतापर्यंत 29 लाख 72 हजार 55 जणांना कोरोनाची लागण झाली आहे.अमेरिकेसारखा बलाढ्य देशही कोरोनापुढे हतबल झाला आहे. अमेरिकेत कोरोनाग्रस्तांची संख्या 9 लाख 60 हजार 896वर गेली असून आतापर्यंत 54 हजार 840 लोकांचा मृत्यू झाला आहे. अमेरिका कोरोनामुळे सर्वाधिक प्रभावित देश आहे.

इटलीमध्ये 1 लाख 95 हजारांवर कोरोनाबाधित असून 26 हजार 640 लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

स्पेनमध्ये 2 लाख 23 हजार 759 लोकांना कोरोनाची लागण झाली असून स्पेनमध्ये 22 हजार 902 जणांचा मृत्यू झाला आहे.

तर फ्रान्समध्ये 1 लाख 61 हजार 488 कोरोनाग्रस्त असून 22 हजार 614 जणांचा कोरोनामुळे बळी गेला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button