breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडराजकारण

चिखली-घरकूल येथे दोन दिवस शिवजयंतीचा उत्सव ; शिवप्रेमींची तुफान गर्दी

  •  शिवतीर्थ प्रतिष्ठानतर्फे शिवजयंती उत्साहात
  •  सामाजिक कार्यकर्ते निलेश नेवाळे यांच्यातर्फे आयोजन

पिंपरी । प्रतिनिधी

चिखली- घरकूल येथील शिवतीर्थ प्रतिष्ठानच्या वतीने शिवजन्मोत्सव दोन दिवस शिवजयंती उत्सव साजरा करण्यात आला. शिवजयंतीच्या पूर्वसंध्येला शाहिरी पोवाडा आणि शिवपाईक पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. तर शिवजयंतीदिवशी परिसरातून भव्य मिरवणूक काढण्यात आली.

भाजपा शहराध्यक्ष व आमदार महेश लांडगे या कार्यक्रमाला उपस्थित होते. सामाजिक कार्यकर्ते निलेश नेवाळे यांच्या पुढाकाराने शिवजयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. शुक्रवारी सायंकाळी सहा वाजता शिवशाहीर प्रवीण जाधव यांचा पोवाड्याचा कार्यक्रम झाला. त्यानंतर शिवपाईक पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. सन २०२१ चा शिवपाईक पुरस्कार मल्हार पारंपरिक ढोल ताशा पथकाचे संस्थापक स्व. पै. समीर अढळ यांना देण्यात आला. तसेच, बजरंग दल घरकुल शाखेचे अध्यक्ष शिवश्री पन्नालाल जाधव यांनाही शिवपाईक पुरस्काराने गौरविण्यात आले.

शनिवारी भव्य शोभायात्रा काढण्यात आली. मेघडंबरी रथ, वारकरी, पालखी, मल्हार पारंपरिक ढोल ताशा पथक हे यावेळी आकर्षण होते. फेडरेशन ऑफ घरकुल, संचालक व प्रतिनिधी शिवतीर्थ प्रतिष्ठान, शिवरक्त प्रतिष्ठान, समस्त घरकुल नागरिकांच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन केले. घरकुल येथील मेन सर्कल येथे हा दिमाखदार कार्यक्रम झाला. सामाजिक कार्यकर्ते निलेश नेवाळे आणि सरिता नेवाळे यांनी शिवजयंती सोहळ्यात पुढाकार घेतला.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button