breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडराजकारण

शिवयंती उत्सव घराघरांत सणांप्रमाणे साजरा व्हावा : विनायक आबा मोरे

  •  चिखली परिसरात शिवजयंतीनिमित्त विविध कार्यक्रम
  •  सामाजिक, सांस्कृति कार्यक्रमांची रेलचेल, नागरिकांचा उत्साह

पिंपरी । प्रतिनिधी

छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती प्रत्येक घरात अगदी उत्सव- सण समारंभासारखी साजरी व्हावी. नव्या पिढीला शिवरायांचे विचार कळावेत. स्वराज्य निष्ठा आणि लोकराज्य याचे संस्कार घडावेत, असे मत सामाजिक कार्यकर्ते विनायक आबा मोरे यांनी व्यक्त केले.

गणेशनगर, चिखली येथे मोठ्या उत्साहात हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, लोककल्याणकारी रयतेचे राजे श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली. पोवाडा, वेशभूषा, सांस्कृतिक कार्यक्रमांद्वारे परिसरातील नागरिक या जयंतीत्सोवात सहभागी झाले. सोसायटीतील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

यावेळी विनायक आबा मोरे, सामाजिक कार्यकर्ते जितेंद्र यादव, सोनम मोरे, शितल यादव उपस्थित होते. शितल यादव यांच्या पुढाकाराने परिसरातील महिलांना वृक्ष रोपांचे वाटप करण्यात आले.
शिवरायांचे विचार नव्या पिढीपर्यंत पोहोचावेत. तसेच, घराघरांत शिवजयंती साजरी व्हावी. यासाठी सामाजिक कार्यकर्ते विनायक आबा मोरे यांनी पुढाकार घेतला. आय. आय. बी. एम. कॉलेज ऑफ हॉटेल मॅनेजमेंट, चिखली येथे शिवजयंती निमित्त शिवव्याख्याते प्रा. प्रदीप कदम यांचे ‘श्री छत्रपती शिवराय अणि आजचा तरुण’ या विषयावर शिव व्याख्यान झाले. तसेच, अखिल टाळगाव चिखली सोसायटी लीग यांच्या वतीने भव्य फुल पिच टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत परिसरातील विविध संघांनी सहभाग नोंदवला.

विविध ठिकाणी झालेल्याकार्यक्रमासाठी नगरसेविका साधना मळेकर, सामाजिक कार्यकर्ते अमृत सोनवणे, जितेंद्र यादव, अंकुश मळेकर, यश साने, अविनाश मोरे, संतोष भांगरे, नवनाथ चव्हाण, अतिन रोकडे, अतुल बनकर, अजय चव्हाण, नटराज बोबडे आदी उपस्थिती होते.

  • सोसायट्यांमध्ये शिवजयंती उत्सव…

चिखली परिसरातील केसर हाउसिंग सोसायटी, संस्कृती हाउसिंग सोसायटी, विस्टरिया हाउसिंग सोसायटी, अभंग विश्व हाउसिंग सोसायटी, महादेव पार्क, आरंभ सोसायटी, अंजनीगाथा, साई एक्झोटीका आदी सोसायट्यांमध्ये शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली. सामाजिक कार्यकर्ते विनायक आबा मोरे आणि सोनम मोरे यांनी ठिकठिकाणी भेटी देत नागरिक व शिवप्रेमींशी संवाद साधला.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button