ताज्या घडामोडीराष्ट्रिय

कमाल! आठवड्याच्या सुरुवातीलाच सेन्सेक्स, निफ्टी तेजीत

भारतीय शेअर बाजार अनेक आठवड्यांनंतर गेल्या आठवड्यात रिकव्हरी मोडमध्ये आला. सेन्सेक्स निफ्टी वाढीसह बंद झाला. या पार्श्वभूमीवर आताच चालू आठवडा अत्यंत महत्त्वाचा आहे. होळीनिमित्त शुक्रवार, १८ मार्च रोजी बाजार बंद राहणार असल्यामुळे या आठवड्यात केवळ चार दिवसच ट्रेडिंग असेल. विशेष म्हणजे भारतीय शेअर बाजाराने आज नव्या आठवड्याची सुरुवात तेजीने केली आहे. जागतिक बाजाराच्या मदतीने सकाळपासून गुंतवणूकदारांची सकारात्मक भावना कार्यरत आहे.

व्यवहाराच्या सुरुवातीला सेन्सेक्स ६४ अंकांच्या वाढीसह ५५,६१४ वर उघडला, तर निफ्टीने ४ अंकांच्या वाढीसह १६,६३४ वर व्यापार सुरू केला. गुंतवणूकदारांच्या खरेदीमुळे दोन्ही एक्सचेंजेसने अल्पावधीतच वेग पकडला. सकाळी १०.३० वाजता सेन्सेक्स २०५ अंकांच्या वाढीसह ५५,७५५ वर व्यवहार करत होता, तर निफ्टी २९ अंकांनी वाढून १६,६५९ वर पोहोचला. दरम्यान, गुंतवणूकदार आज बँकिंग आणि टेक कंपन्यांच्या शेअर्सवर जोरदार खरेदी करत आहेत.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button