breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपश्चिम महाराष्ट्रपुणे

चहा प्या अन् कपही खाऊन टाका, कोल्हापूरात इंजिनिअरची भन्नाट आयडिया

कोल्हापूर |महाईन्यूज|

देशभरात कचऱ्याची समस्या वाढू लागली आहे. एवढ्या लोकसंख्येच्या देशात ही समस्या मोठं रुप धारण करू लागली आहे. दरम्यान कचरा कमी करण्यासाठी प्रत्येकाने खारीचा वाटा जरी उचलला तरी मोठी मदत होऊ शकते. कोल्हापूरच्या तीन इंजिनिअर तरुणांनी लढवलेली खाण्यायोग्य चहाच्या कप्सची शक्कल कचरा कमी करण्यास नक्कीच हातभार लावणारी आहे. दिग्विजय गायकवाड, आदेश कारंडे आणि राजेश खामकर या तरुण इंजिनिअर्सनी खाता येणाऱ्या बिस्किट कपचा वापर करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे कॅफे, चहाची टपरी, कॉफीची दुकानं याठिकाणी होणारा कप्सचा कचरा कमी होण्यास मदत होत आहे. प्लॅस्टिक आणि कागदी कप्ससाठी हे बिस्किट कप किंवा एडिबल कटलरी कप्स एक उत्तम पर्याय ठरत आहेत.

दिग्विजय यांच्या डोक्यामध्ये ही सुपिक कल्पना आली होती आणि ती त्यांनी अभ्यासपूर्वक अंमलात देखील आणली. हैदराबाद आणि गुजरातमध्ये मिळणारे त्यांनी खाण्यायोग्य चमचे आणि कप्स मागवले. दीड वर्ष त्याबाबतीत अभ्यास केला आणि कोल्हापूरातही हा उपक्रम करता येईल असा त्यांनी निश्चय केला. सामान्यांच्या खिशाला परवडेल असे कप्स तयार करण्याचे त्यांनी ठरवले.

हैदराबादमधून त्यांनी हे मशिन बनवून घेतले आहे. लॉकडाऊन काळात त्यांनी या कल्पनेला विशेष वेळ दिला. जानेवारीपासून त्यांनी इतर दोन मित्रांच्या मदतीने या खाण्यायोग्य कप्सची निर्मिती सुरू केली. शहरातील विविध कॅन्टीन, रेस्टॉरंट, कॅफे याठिकाणी त्यांचे कप्स पुरवले जात आगेत. सध्या कप्सबाबतीत सुरू असणारा त्यांचा व्यवसाय वृद्धींगत करण्याचा त्यांचा विचार आहे. कालांतराने बाउल्स आणि प्लेट्स देखील बनवण्याचा या त्रिकुटाचा मानस आहे. इतर काही मित्र आणि काही राजकीय मंडळींची त्यांना यामध्ये मदत केली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button