पिंपरी / चिंचवड

नोकरीच्या आमिषाने तरुणाची फसवणूक

पिंपरी l प्रतिनिधी

नोकरी लावण्याच्या आमिषाने एका व्यक्तीने तरुणाकडून 3200 रुपये घेतले. त्यांनतर तरुणाला नोकरी न लावता त्याची फसवणूक केली. ही घटना 8 नोव्हेंबर 2021 ते 31 जानेवारी 2022 या कालावधीत कासारवाडी, नाशिक फाटा येथे असलेल्या श्लोक ब्राईट लाईट प्रा ली नावाच्या ऑफिसमध्ये घडली.

रुद्र दगडू गिराम (वय 23, रा. थेरगाव. मूळ रा. चोळंबी, ता. भूम, जि. उस्मानाबाद) यांनी याप्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार शिवराज मारुती कदम पाटील (रा. मोहननगर, स्पाईन रोड, भोसरी) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी शिवराज याने फिर्यादी यांना नोकरी लावतो, असे आमिष दाखवून त्यांच्याकडून 3200 रुपये रोख स्वरूपात घेतले. ते पैसे घेतल्यानंतर आरोपीने फिर्यादी यांना नोकरी लावले नाही. तसेच फिर्यादी यांनी दिलेले पैसे परत न करता त्यांची फसवणूक केली.

आरोपी शिवराज याने फिर्यादी प्रमाणे आणखी काही मुलांना नोकरीचे आमिष दाखवून त्यांच्याकडून पैसे घेतले आहेत. त्यांना देखील नोकरी न लावता त्यांची फसवणूक केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पोलीस उपनिरीक्षक रवी भवारी तपास करीत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button