breaking-newsTOP NewsUncategorizedताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांची शिवसेनेतून हकालपट्टी

पिंपरी : शिवसेनेचे उपनेते आणि शिरुर लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. पक्षविरोधी कारवाया केल्याचा ठपका ठेवत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने शिवाजीराव आढळराव पाटील यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धी पत्रक काढून ही माहिती देण्यात आली आहे.

शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानं राज्यात बऱ्याच राजकीय घडामोडी घडल्या. अखेर एकनाथ शिंदे यांची मुख्यमंत्रीपदी नियुक्ती करण्यात आली. त्यानंतर विविध स्तरातून एकनाथ शिंदे यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव झाल्याचं पाहायला मिळालं.

एकनाथ शिंदे यांना शुभेच्छा पोस्ट

दरम्यान शिवसेनेचे उपनेते आणि माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी देखील सोशल मीडियावर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी शुभेच्छा दिल्या. यामध्ये त्यांनी ‘गर्जत राहील आवाज हिंदुत्वाचा अभिनंदन मुख्यमंत्री साहेब’ असं म्हटलं आहे. तसेच या पोस्टमध्ये आढळराव पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा कुठेही फोटो टाकला नाही.

कोण आहेत शिवाजीराव आढळराव पाटील

शिवाजीराव आढळराव पाटील हे शिवसेनेचे मोठे नेते मानले जातात. पुणे जिल्ह्यात शिवसेना वाढवण्यात त्यांचा मोठा वाटा आहे. त्यांनी 2004 मध्ये शिरुर लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेच्या तिकिटावर विजय मिळवला होता. त्यानंतर 2009 आणि 2014 लोकसभा निवडणुकीत देखील त्यांनी विजय मिळवला होता. शिरुर लोकसभा मतदारसंघाचं पाटील यांनी 15 वर्ष प्रतिनिधीत्त्व केलं. शिरुर लोकसभा मतदारसंघाचे खासदार म्हणून त्यांच्या संसदेतील कामगिरीनिमित्त त्यांना संसदरत्न पुरस्कार देखील मिळाला आहे. मात्र, 2019 च्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार अभिनेते अमोल कोल्हे यांनी आढळराव पाटील यांचा पराभव केला. हा पराभव आढळराव पाटील यांच्यासाठी मोठा धक्का मानला गेला.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button