breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

PCMC : ‘वाघिन इज कम बॅक’ ; राष्ट्रवादीच्या विरोधी पक्षनेत्याचे पद धोक्यात?

भाजपा नगरसेविका सीमा सावळे यांचा पहिला दणका

राष्ट्रवादीचे विरोधी पक्षनेते नाना काटे यांच्यावर ‘निशाणा’

पिंपरी । महाईन्यूज । विशेष प्रतिनिधी

भारतीय जनता पक्षाच्या विद्यमान नगरसेविका आणि माजी स्थायी समिती अध्यक्षा सीमा सावळे यांनी ‘पत्रक बॉम्ब’ टाकला आहे. (Seema Savale and Nana Kate) राष्ट्रवादीचे विरोधी पक्षनेते विठ्ठल उर्फ नाना काटे यांचे जनसंपर्क कार्यालय अनधिकृत आहे, असा दावा करीत राष्ट्रवादीसह महापालिकेतील विरोधकांना पहिला दणका दिला आहे.

        पिंपरी-चिंचवड महापालिकेत तब्बल १५ वर्षे सत्ता भोगलेल्या राष्ट्रवादीला सत्तेतून पाय उतार करण्यास भाग पाडणारी ‘वाघिन’ म्हणून भाजपसह पूर्वाश्रमीच्या शिवसेनेत (Shivsena) सीमा सावळे यांची ओळख आहे. २०१७ मध्ये भाजपाने महापालिकेत सत्ता मिळवली. पण, भष्टाचाराच्या अनेक प्रकरणांचा पर्दाफाश करुन तत्कालीन सत्ताधारी राष्ट्रवादीला सळो की पळो करुन सोडणाऱ्या सीमा सावळे लोकसभा आणि विधानसभा (२०१९) मध्ये राजकीय पटवलावरून गायब होत्या. विशेष म्हणजे, पिंपरी विधानसभा मतदार संघातून उमेदवारी अपेक्षा असतानाही पक्षाने संधी न दिल्यामुळे शहराच्या राजकारणातून सावळे सन्यास घेतील काय? अशी चर्चा होती. मात्र, म्हणतात ना ‘‘बंदर कितना भी बुढा हो जाये…गुलाटी मारना छोडता नही’’ तसेच झाले. सीमा सावळे यांनी पुन्हा आपला मोर्चा विरोधकांच्या दिशेने वळवला आहे. त्यामुळे भाजपाच्या ‘वाघिनीचे कम बॅक’ झाले आहे, अशी चर्चा राजकीय वर्तळात पहायला मिळत आहे.

वास्तविक, राज्यात महाविकास आघाडीचे सरकार म्हणजे शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस मित्र पक्षांचे सरकार आल्यानंतर शहरातील बलाढ्य मानल्या जाणाऱ्या राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांचा ‘कॉन्फीडन्स’ कमालीचा वाढला होता. त्यामुळे पालकमंत्री अजित पवार आहेत. आता आम्ही कोणत्याही कामाची चौकशी लावणार आणि भाजपाला जेरीस आणणार…असा आविर्भाव राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांना आहे. राष्ट्रवादीची वाढलेली वळवळ पाहून भाजपच्या दोन्ही आमदारांनी कालच (शनिवारी) पत्रकार परिषद घेतली. शहराध्यक्ष आमदार महेश लांडगे आणि आमदार लक्ष्मण जगताप यांनी राज्य सरकारने कोणत्याही कामाची खुशाल चौकशी करावी, असे आव्‍हान दिले. त्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी सीमा सावळे यांनी राष्ट्रवादीच्या विरोधी पक्षनेत्याचे जनसंपर्क कार्यालय कसे अनधिकृत आहे? ही बाब चव्‍हाट्यावर आणली. विरोधी पक्षातील प्रमुख चेहरा असलेल्या नाना काटे यांच्या कार्यालयावर ‘पत्रक बॉम्ब’ टाकल्याने राष्ट्रवादीला हा घाव जिव्‍हारी लागणार यात शंका नाही.

दरम्यान, विरोधी पक्षनेते नाना काटे हे आता सीमा सावळे यांच्या पत्रकबाजीला कशाप्रकारे उत्तर देतात याकडे शहरवासीयांचे लक्ष लागले आहे. कारण, आगामी २०२२ मध्ये होणाऱ्या महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाने रणनिती तयार केली आहे. त्यामध्ये शहर राष्ट्रवादीतील प्रमुख चेहऱ्यांना ‘टार्गेट’ केले जाणार आहे. त्यातील पहिला ‘निशाणा’ विरोधी पक्षनेते झाले आहेत. आगामी काळात आणखी कोण-कोण ‘हिटलिस्ट’वर आहेत, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

नाना काटे यांचे कार्यालय बेकायदा कसे?

पिंपळे सौदागर येथील सर्व्हे क्रमांक १८३ मध्ये शिवांगण सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या आवारातील राष्ट्रवादीचे विरोधी पक्षनेते नाना काटे यांचे जनसंपर्क कार्यालय आहे. त्याचे बांधकाम परवानगी नियम धाब्याबर बसवून उभारण्यात आले आहे. इमारतीच्या सामासिक अंतरात (साईड मार्जिन) जनसंपर्क कार्यालय आणि पत्र्याचे शेड बेकायदेशीरपणे थाटले आहे. पिंपरी चिंचवड महापालिकेचे विरोधी पक्षनेते तथा राष्ट्रवादीचे गटनेते नाना काटे यांचे आणि त्यांच्या सौभाग्यवती शितल काटे यांचे नगरसेवक पद रद्द करा, अन्यथा न्यायालयात दाद मागणार, असा इशारा सीमा सावळे यांनी दिला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button