breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

विश्वासाचं दुसरं नाव टाटा… देशवासियांना दिलेला शब्द चौथ्याच दिवशी पूर्ण केला!

नवी दिल्ली – देशभरात कोरोनाने थैमान घातलं असून वाढत्या रुग्णसंख्येमुळे आरोग्य यंत्रणांवर मोठ्या प्रमाणात ताण येत असल्याचं चित्र सध्या पाहायला मिळत आहे. त्यातच भारतातील अग्रगण्य मानल्या जाणाऱ्या कंपन्यांपैकी एक असलेल्या टाटा कंपनीने पुढाकार घेत दोन दिवसांपूर्वी या गंभीर संकटाशी लढण्यासाठी 200 ते 300 टन मेडिकल ऑक्सिजनचा पुरवठा परदेशातुन करण्यास सुरुवात केली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 20 एप्रिल रोजी केलेल्या आवाहनाला साथ देत परदेशातून भारतीयांसाठी ऑक्सीजन निर्यात करण्याचा निर्णय टाटा घेतला असल्याची माहिती त्यांनी आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरून दिली. यासाठी 24 मोठ्या आकाराचे क्रायोजनिक टँकर आयात करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती टाटा ग्रुपने आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरून दिली होती.

यासंबंधी भारतातील आरोग्य व्यवस्था बळकट करण्यासाठी शक्य तेवढ्या गोष्टी करू अशाप्रकारे टाटा उद्योग समूहाने भूमिका घेतल्याने त्यांचं सर्वच स्तरातून कौतुक केलं जात आहे. टाटा उद्योग समूह नेहमीच संकटाच्या काळामध्ये भारतीय नागरिकांसाठी धावून आल्याचं पाहायला मिळत आलं आहे.

देश कोरोनासारख्या भयंकर महामारीच्या संकटाशी लढत असताना टाटा समूहाने शब्द दिल्यानंतर अवघ्या चारच दिवसात भारतीय हवाई दलाच्या मदतीने 4 क्रायोजेनिक ऑक्सिजन वाहक टँकर भारतामध्ये आणले आहे. हे सर्व टॅंकर्स सिंगापूरवरून आणण्यात आल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. याबरोबरच, हे सर्व काम सिंगापूरमधील भारतीय दूतावास, सिंगापूर संरक्षण मंत्रालय, भारतीय हवाई दल आणि सिंगापूरमधील नागरी हवाई उड्डाण मंत्रालय तसेच लिंडी गॅस प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या सहकार्याने शक्य झाल्याचंही टाटा कंपनीने सांगितलं आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button