breaking-newsमनोरंजनराष्ट्रिय

‘या’ हॉट अभिनेत्रीचा भाजपात प्रवेश

दाक्षिणात्य सुप्रसिद्ध अभिनेत्री नमिता यांनी भाजपाचे कार्यकारी अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या उपस्थितीत भाजपामध्ये जाहीर प्रवेश केला आहे. नमिता यांच्यासह अभिनेते राधा रवी यांनीही भाजपात प्रवेश केला. जे.पी नड्डा शनिवारी चेन्नईच्या दौऱ्यावर होते. यावेळी नमिता आणि राधा रवी यांनी भाजपाचे सदस्यत्व स्वीकारले.

अभिनेत्री नमिता यांनी बिल्ला, इंग्लिश करन, जगन मोहिनी यासारख्या चित्रपटांत मुख्य भूमिका केल्या आहेत. नमितांनी २००१ मध्ये मिस सुरतचे जेतेपद जिंकले, तर मिस इंडियाची उपविजेत्याही राहिल्या आहेत. नमिता यांचा दक्षिण भारतात मोठा चाहता वर्ग आहे. कोयंमतूरमध्ये एका चाहत्याने नमिताचे मंदिर उभारले होते. ग्लॅमरस आणि बोल्ड अंदामुळे नमिता लोकांमध्ये चर्चेत आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button