breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

मंदिरात घंटा वाजवण्यास मनाई; मॉलमधील दुकाने उघडता येणार

नवी दिल्ली | अनलाॅक-१ अंतर्गत देशातील मोठ्या भागात ८ जूनपासून रेस्तराँ, धार्मिक स्थळे, माॅल्स व हाॅटेल्स उघडता येतील. यासाठी केंद्राने गुरुवारी स्टँडर्ड अाॅपरेटिंग प्राेसिजर (एसअाेपी) जारी केली. रेस्तराँत निम्म्या सीट्स रिकाम्या सोडाव्या लागतील. धार्मिक स्थळी प्रसाद वाटप व घंटी वाजण्यास मनाई असेल. मॉल्समध्ये मुलांच्या खेळण्याची जागा बंद ठेवावी लागेल. हॉटेल्समध्ये फक्त डिजिटल पेमेंट करण्यास सांगितले आहे.

मूर्तींना स्पर्श करता येणार नाही

 मास्कविना प्रवेश मिळणार नाही. मोजक्या भाविकांना वेगवेगळ्या वेळी प्रवेश दिला जाईल. साबणाने हातपाय धुवावे लागतील.
बूट-चप्पल वाहनातच सोडावे लागतील. अन्यथा बाहेर रॅकवर ठेवावे लागतील.
रांगेत फिजिकल डिस्टन्सिंगनेच उभे राहावे लागेल. येण्याजाण्याचे मार्ग वेगळे असतील.
मूर्ती व ग्रंथांना स्पर्श करता येणार नाही. घंटाही वाजवता येणार नाही. इतकेच नव्हे तर भजनी मंडळांवरही बंदी असेल.
मंदिरात बसून पूजा करण्यासाठी भाविकाला आपल्या घरूनच चटई घेऊन यावी लागेल.
प्रसाद वाटप, तीर्थ शिंपडण्यास बंदी असेल. सामुदायिक भोजन, लंगर, अन्नदान आदी फिजिकल डिस्टन्सिंगनेच करता येईल.

डिजिटल पेमेंट होणार

कॉन्टॅक्टलेस चेक-इन व चेक-आउटची व्यवस्था करावी लागेल. गेस्टचे लगेज रूममध्ये ठेवण्यासाठी ते सॅनिटाइझ करावे लागेल.
गेस्टसाठी रूम सर्व्हिस असेल, मात्र सर्व संवाद रूममधील फोन किंवा मोबाइलवरूनच करावा लागेल.

मेन्यू कार्डही डिस्पोजेबल

बसून खाण्याऐवजी ‘टेक अवे’ला उत्तेजन दिले जाईल. हाेम डिलिव्हरी करणारे कर्मचारी पॅकेट दरवाजाबाहेर ठेवतील.
एंट्री गेटवर हात सॅनिटाइझ करणे व थर्मल स्क्रीनिंगची व्यवस्था असेल. वेगवेगळ्या वेळी थाेडे-थाेडे कर्मचारी बोलावले जातील. काेराेनापासून बचावाच्या उपायांचे अाॅडिअाे-व्हिडिओ मेसेज दिले जातील.
व्हॅले पार्किंगची सुविधा असल्यास गाडीचे स्टिअरिंग, डाेअर हँडल, चावी आदी संपूर्णपणे निर्जंतुक केली जाईल.
डिस्पाेजेबल मेन्यू कार्ड वापरावे लागतील. कपड्यांच्या नॅपकिनएेवजी डिस्पाेजेबल पेपर नॅपकिन असतील. नवीन ग्राहक बसण्याच्या पूर्वीच टेबल सॅनिटाइझ केला जाईल.

एसी २४-३० डिग्री, तर ह्यूमिडिटी ४०-७०% ठेवा

कोणत्याही दुकानात मर्यादित ग्राहकांना प्रवेश द्यावा लागेल.
पार्किंग व माॅल परिसराबाहेर गर्दी आवरण्यासाठी व्यवस्थापनाला योग्य व्यवस्था करावी लागेल.
एलिव्हेटरमध्येही मर्यादित प्रवेश द्यावा लागेल.
फूड काेर्टमध्ये निम्म्यापेक्षा जास्त सीट्स रिकाम्या ठेवाव्या लागतील.
लोकांचा एकमेकांशी कमीत कमी संपर्क येईल, अशी ऑर्डर व पेमेंट व्यवस्था ठेवावी लागेल.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button