पिंपरी / चिंचवड
शिवजयंती निमित्त आरोग्य शिबिराचे आयोजन
पिंपरी | प्रतिनिधी
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त चिंचवडगावातील पुनरुत्थान समरसता गुरुकुलम येथे आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
19 फेब्रुवारी (शनिवार) रोजी सकाळी नऊ ते दुपारी एक वाजताच्या कालावधीत हे शिबीर होणार आहे. मेडिव्हिजन महाराष्ट्र व डॉ. डी वाय पाटील डेंटल कॉलेज यांच्या वतीने हे शिबीर आयोजित करण्यात आले आहे.