TOP Newsताज्या घडामोडीदृष्टीक्षेपमहाराष्ट्रमुंबईराजकारणराष्ट्रिय

आमदार राहुल कुल यांच्याविरोधात संजय राऊतांनी घेतली सीबीआयकडे धाव

मुंबई: दौंड तालुक्यातील भीमा पाटस सहकारी साखर कारखान्यातील कथित भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरुन ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी काही दिवसांपूर्वी भाजप आमदार राहुल कुल यांच्यावर गंभीर आरोप केले होते. गेल्या महिन्यात संजय राऊत यांनी हे प्रकरण समोर आणले होते. ५०० कोटींच्या या प्रकरणाची ईडी आणि सीबीआयमार्फत चौकशी करावी, अशी मागणी संजय राऊत यांनी केली होती. मात्र, त्यानंतर राज्य सरकारकडून किंवा संबंधित तपास यंत्रणांकडून काही पावले उचलण्यात आली नव्हती. त्यामुळे या प्रकरणाच्या चौकशीची मागणी बासनात गुंडाळली जाणार, असे वाटत होते. परंतु, संजय राऊत हे काही केल्या राहुल कुल यांचा पिच्छा सोडायला तयार नाहीत.

संजय राऊत यांनी आता या कथित आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात थेट केंद्रीय अन्वेषण विभागाकडे अर्थात सीबीआयकडे तक्रार दाखल केली आहे. राऊत यांनी ट्विट करुन यासंदर्भात माहिती दिली. भीमा-पाटस सहकारी कारखान्यातील ५०० कोटी रुपयांच्या गैरव्यहारप्रकरणी मी केलेल्या तक्रारीकडे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दुर्लक्ष केले. त्यामुळे मी आता सीबीआयचा दरवाजा ठोठावला आहे. आता काय घडते ते पाहू, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे. राज्य सरकार राहुल कुल यांची चौकशी करत नसल्याने संजय राऊत नाईलाजाने चौकशीचा नाद सोडून देतील, असा अंदाज होता. परंतु, राऊतांनी आता सीबीआयकडे धाव घेत आपण राहुल कुल यांचा पिच्छा सोडणार नाही, असे संकेत दिले आहेत.

संजय राऊतांनी कुल यांच्यावर नेमके काय आरोप केले?
संजय राऊत यांनी मार्च महिन्यात देवेंद्र फडणवीस, अमित शाह, पंतप्रधान कार्यालय यांना एक पत्र पाठवले होते. या पत्रात भीमा-पाटस सहकारी कारखान्यातील ५०० कोटींच्या कथित आर्थिक गैरव्यवहाराचा उल्लेख होता. भारतीय जनता पक्षाचे काही नेते जे आपल्या अंतस्थ गोटात वावरत असतात, ते सातत्याने प्रमुख विरोधी पक्षाचे व्यवहार, त्यांचे साखर कारखाने याबाबत भ्रष्टाचाराची प्रकरणे समोर आणत आहेत व या नेत्यांच्या मागे केंद्रीय यंत्रणांचा ससेमिराही लावला जातो. भ्रष्टाचारास धर्म व राजकीय पक्ष नसतो. त्यामुळे भ्रष्टाचाराची वाळी नष्ट होणे गरजेचे आहे, या मताचा मी आहे. भीमा सहकारी साखर कारखान्यातील शेकडो कोटींचा गैरव्यवहार भयंकर असून या भ्रष्टाचाराला राजकीय संरक्षण मिळत असेल तर ते गंभीर आहे. भाजपच्या भ्रष्टाचार विरोधी मोहिमेचे मुख्य सुत्रधार श्री. किरीट सोमय्या यांच्या स्वतंत्र यंत्रणेमार्फत आपण भीमा सहकारी कारखान्यातील भ्रष्टाचाराची माहिती घेऊ शकता. त्यांच्या कार्यालायत हे प्रकरण संबंधित तक्रारदार घेऊन गेले आहेत. पण किरीट सोमय्या त्या भ्रष्टाचारावर मूग गिळून गप्प बसले आहेत. त्यामुळे हे सर्व प्रकरण तत्काळ ईडी व सीबीआयकडे देऊन भीमा सहकारी कारखान्यातील घोटाळेबाजांवर कारवाई करावी, अशी मागणी संजय राऊत यांनी केली होती.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button