breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड
मुंबई-पुणे मार्गावर खंडाळा घाटातील सैल दरडी काढण्याचे काम सुरू
पिंपरी, (महा-ई-न्यूज) – मुंबई-पुणे राष्ट्रीय द्रुतगती मार्गावर खंडाळा घाट परिसरातील सैल दरडी काडण्याच्या कामाला आजपासून सुरुवात केली आहे. आज सकाळी दहा ते दुपारी साडेतीन या वेळेत पंधरा मिनिटाचे पाच ब्लॉक घेत हे काम करण्यात आले.
या ब्लॉक दरम्यान मुंबई आणि पुणे या दोन्ही मार्गावंरील वाहतूक थांबविण्यात आली होती. 20 मार्चपर्यंत हे ब्लॉक घेण्यात येणार आहेत. दरम्यान येणार्या शनिवारी आणि रविवारी वाहतूक सुरु राहणार आहे. सोमवार ते शुक्रवारी सकाळी (10 ते 10.15), (11 ते 11.15), (12 ते 12.15), दुपारी (2 ते 2.15) व (3 ते 3.15) या वेळेत वाहतूक बंद राहणार आहे.
द्रुतगती मार्गावरुन प्रवास करणार्या नागरिकांनी आणि प्रवाशांनी ब्लॉक दरम्यान गैरसोय टाळण्याकरिता वेळेचे नियोजन करुन प्रवास करावा अथवा पर्यायी मार्गाचा वापर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.