breaking-newsआंतरराष्टीयताज्या घडामोडी

Facebook, Google, Twitter पाकिस्तानला कंटाळले, दिला ‘हा’ इशारा

नवी दिल्ली | महाईन्यूज

सध्या सर्वत्र Facebook, Twitter, Google याचा वापर हा मोठ्या प्रमाणात केला जातो. मात्र आता गुगल, फेसबुक आणि ट्विटर या तिन्ही कंपन्या पाकिस्तानला कंटाळलेल्या आहेत. काही दिवसांपूर्वी पाकिस्ताननेसोशल मीडियासाठी काही नवे नियम लागू केलेले आहे. त्यामुळे पाकिस्तानमध्ये सेवा पुरवण्यात समस्या निर्माण होत आहेत. ‘एशिया इंटरनेट कॉलिशन’तर्फे (AIC) पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्याकडे पत्राद्वारे नव्या नियमांमध्ये बदल करण्याची मागणी करण्यात आलेली आहे. नियमांमध्ये बदल न केल्यास पाकिस्तानमध्ये सेवा बंद करण्याचा इशारा देण्यात आलेला आहे.

डिजिटल कायद्यावरून या तीन कंपन्यांनी पाकिस्तानला स्पष्ट शब्दांत इशारा दिला आहे. फेसबुक, गुगल आणि ट्विटर यासारख्या कंपन्यांवर सेन्सॉरशीप लावण्यात आल्याने त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. ‘जर पाकिस्तानने डिजिटल सेन्सॉरशीप कायद्यात बदल केला नाही तर पाकिस्तानमधील आपली सेवा बंद करण्यात येईल’ असं इम्रान खान यांना पाठवण्यात आलेल्या पत्रात म्हटलेलं आहे. तसेच नव्या नियमांनुसार या कंपन्यांना इस्लामाबादमध्ये आपलं कार्यालय सुरू करणं बंधनकारक करण्यात आलं आहे. तसंच त्यांना पाकिस्तानमध्ये डेटा सेंटर सुरू करावं लागणार आहे. तसंच त्यांना युजर्सचा डेटाही सरकारसोबत शेअर करावा लागणार आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button