breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीदेश-विदेशमहाराष्ट्रमुंबईराष्ट्रिय

रतन टाटांचा ऑस्ट्रेलियाच्या सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मान!

मुंबई : भारतीय उद्योग क्षेत्रातील दिग्गज, टाटा ग्रुपचे मानद अध्यक्ष रतन टाटा यांना ऑस्ट्रेलियातील सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे. याबाबत ऑस्ट्रेलियाचे भारतातील राजदूत बॅरी ओ फॅरेल यांनी ट्वीट करत माहिती दिली आहे. त्यांनी ट्वीटमध्ये म्हटलंय की, रतन टाटा यांना ‘ऑर्डर ऑफ ऑस्ट्रेलिया’ने सन्मानित करण्यात आलं आहे.

ऑस्ट्रेलियाचे राजदूत बॅरी फॅरेल यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलंय की, भारतासह ऑस्ट्रेलियासाठी रतन टाटा यांनी योगदान दिलं असून ते एक महान उद्योजक आहेत. ऑस्ट्रेलिया-भारत संबंधांबद्दल दीर्घकालीन वचनबद्धतेची दखल घेऊन रतन टाटा यांना ऑर्डर ऑफ ऑस्ट्रेलियाने सन्मानित करताना अतिशय त्यांना आनंद होत आहे.

भारतीय उद्योगपती रतन टाटांची ऑस्ट्रेलिया आणि भारत यांच्या द्विपक्षीय संबंध, व्यापार, गुंतवणूक आणि सामाजिक योगदानासाठी ऑस्ट्रेलियाच्या जनरल डिव्हीजनमध्ये मनाद अधिकारी पदावरही निवड करण्यात आली आहे. टाटा पॉवर ओडिशा डिस्ट्रिब्युशन लिमिटेडचे एक्सिक्युटिव्ह राहुल रंजन यांनी आपल्या लिंक्डइनवर या पुरस्कार सोहळ्याचे काही फोटोही शेअर केल आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button