breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

दिल्लीच्या खान मार्केटमध्ये ‘पाकिस्तान जिंदाबाद’च्या घोषणा

नवी दिल्ली – राजधानी दिल्लीतील खान मार्केट भागात ‘पाकिस्तान जिंदाबाद’च्या घोषणा दिल्याचा प्रकार समोर आला आहे. मध्यरात्री एक वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला. या प्रकरणी पोलिसांनी रविवारी पहाटेच्या सुमारास दोन पुरुष आणि तीन महिलांना ताब्यात घेतले असून त्यांची चौकशी सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, तुघलक रोड पोलीस ठाण्यात मध्यरात्री एक फोन आला. खान मार्केट मेट्रो स्टेशनजवळ काहीजण ‘पाकिस्तान जिंदाबाद’च्या घोषणा देत असल्याचे फोन करणाऱ्याने पोलिसांना सांगितले. त्यानंतर पोलीस अधिकारी तिथे पोहोचले असता त्यावेळी दोन पुरुष आणि तीन महिला बाईकवर बसल्या होत्या. पोलिसांनी प्रश्नांची सरबत्ती सुरू केल्यानंतर आम्ही इंडिया गेट परिसर पाहण्यासाठी आलो आहोत. त्यासाठी बाईक भाड्यावर घेतल्या आहेत, असे त्यांनी सांगितले. तसेच ‘वेगात बाईक पळवण्याची आम्ही शर्यत लावली होती. त्यावेळी आम्ही परस्परांचा वेगवेगळ्या देशांच्या नावांवरुन पुकार करत होतो. एक जण त्यातला पाकिस्तानातून आला होता. त्याने पाकिस्तान जिंदाबादची घोषणा दिली’, असे त्यांनी सांगितले. या प्रकरणात पोलिसांकडून दोन पुरुष, तीन महिला आणि त्यांच्या कुटुंबीयांची चौकशी सुरु आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button