TOP Newsताज्या घडामोडीमनोरंजन

संजय लीला भन्साळींच्या ‘हिरामंडी’ची जोरदार चर्चा, रेखासह माधुरी शेअर करणार स्क्रीन?

संजय लीला भन्साळी हे नाव ऐकलं की भव्यदिव्य चित्रपट आपल्या डोळ्यासमोर उभे राहतात. ‘देवदास’, ‘हम दिल दे चुके सनम, ‘बाजीराव मस्तानी’ ‘पद्मावत’ पासून नुकत्याच आलेल्या ‘गंगूबाई काठियावाडी’पर्यंत कित्येक डोळे दिपवणारे चित्रपट भन्साळी यांनी दिले. आता त्यांच्या आगामी ‘हिरामंडी’ या वेबसीरिजची सर्वत्र चर्चा सुरू आहे. या वेबसीरिजसाठी ते आता नवीन कव्वालीचं चित्रीकरण करणार असल्याची बातमी समोर येत आहे.

संजय लीला भन्साळी ही सिरिज नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मसाठी करत असून ज्येष्ठ अभिनेत्री रेखा आणि मुमताज या दोघींची झलक या सीरिजमध्ये दिसू शकते अशी शक्यता वर्तवली जात आहे. अर्थात याबद्दल अजूनतरी कोणतीची अधिकृत घोषणा झालेली नाही. सोनाक्षी सिन्हा, मनीष कोइराला, अदिती राव हैदरी, रिचा चड्ढासारख्या अभिनेत्री या वेबसीरिजच्या चित्रीकरणात सध्या व्यस्त आहेत.

https://www.instagram.com/netflix_in/?utm_source=ig_embed&ig_rid=fb14274f-307a-4245-9ecc-2c13308419ab

सूत्रांच्या माहितीनुसार असं म्हंटलं जातंय की येत्या काही दिवसात एका भव्य कव्वालीचं चित्रीकरण भन्साळी करणार आहेत. यामध्ये प्रामुख्याने अदिती राव हैदरी आणि मनीषा कोइराला यांच्यात जुगलबंदी पाहायला मिळू शकते. गेल्याच महिन्यात भन्साळी यांनी सोनाक्षी, अदिती, रिचा आणि मनीषा यांच्यावर एकत्रित असं एका गाण्याचं चित्रीकरण केलं आहे. या सीरिजमध्ये रेखा आणि मुमताज यांच्याबरोबरीनेच धकधक गर्ल माधुरी दीक्षितसुद्धा दिसण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

ब्रिटिशकाळात ओळखल्या जाणाऱ्या ‘हिरामंडी’ भागातील वेश्याव्यवसाय करणाऱ्या ३ पिढ्यांच्या नायिकांवर सीरिजची कथा बेतलेली आहे. भन्साळी यांच्या इतर चित्रपटांप्रमाणेच ही वेबसीरिजसुद्धा भव्यदिव्य असणार आहे याबद्दल दुमत नाही. नेटफ्लिक्सची ही अत्यंत महागडी वेबसीरिज आहे. शिवाय या सीरिजच्या माध्यमातून दिग्दर्शक संजय लीला भन्साळी ओटीटीविश्वात पदार्पण करत आहेत.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button