breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

महापालिकेच्या सर्वसाधारण सभा नगरसेवक व अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत करा

– अध्यादेश काढण्याची नगरसेवक संजय वाबळे यांची पालकमंत्री अजित पवार यांच्याकडे मागणी

पिंपरी । प्रतिनिधी
कोविडमुळे मागील १० महिन्यांपासून पिंपरी चिंचवड महापालिकेची सर्वसाधारण सभा ऑनलाईन होत आहे. सध्या कोविड १९ चा प्रादुर्भाव कमी झाला आहे. त्यामुळे पूर्वीप्रमाणे सभागृहात नगरसेवक व अधिकारी यांनी प्रत्यक्ष उपस्थित राहून सभा घेण्याबाबचा अध्यादेश काढा, अशी मागणी महापालिकेचे स्वीकृत नगरसेवक संजय वाबळे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.

पिंपरी चिंचवड महारपालिकेचे स्वीकृत नगरसेवक संजय वाबळे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची पुणे येथील नवीन शासकीय विश्रामगृह याठिकाणी भेट घेतली. या वेळी निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली. या वेळी इंद्रायणीनगर मधील भोसरी मध्यवर्ती सुविधा केंद्रातील सार्वजनिक प्रयोजनासाठी आरक्षित जागांचा विकास पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने करण्याविषयीचे देखील निवेदन देण्यात आले.

या वेळी उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाकडील विकसित क्षेत्र भाग महापालिकेकडे तर अविकसित क्षेत्र पीएमआरडीएकडे हस्तांतरीत करणार आहे. तर भोसरी मध्यवर्ती सुविधा केंद्रातील आरक्षणे विकसित करण्याबाबत महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याशी चर्चा करणार असल्याचे सांगितले. तसेच दिलेल्या निवेदनावर सकारात्मक निर्णय घेऊ, असे आश्वासन मंत्री अजित पवार यांनी नगरसेवक वाबळे यांना दिले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button