breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

धक्कादायक! छत्तीसगडमध्ये ३ दिवसांत ३ जंगली हत्तींचे मृतदेह सापडले, अधिकाऱ्यांना घातपाताचा संशय

केरळमध्ये गर्भवती हत्तीणीचा स्फोटक भरलेलं अननस खाल्ल्यामुळे मृत्यू झाल्याची घटना काही दिवसांपूर्वी समोर आली होती. प्रसारमाध्यमांमध्ये ही बाब समोर आल्यानंतर सर्वच स्तरातून रोष व्यक्त करण्यात आला होता. यानंतरही देशात हत्तींचे जीव जाण्याचं सत्र सुरुच आहे. गेल्या ३ दिवसांत छत्तीसगडमध्ये ३ हत्तींचा मृत्यू झाल्याचं कळत आहे. या ३ हत्तींपैकी एक हत्तीण २० महिन्यांची गर्भवती असल्याचं समोर आलं आहे. या हत्तींच्या मृत्यूचं खरं कारण अद्याप समजलं नसलं तरीही वन अधिकाऱ्यांनी यामागे घातपाताचा संशय व्यक्त केला आहे.

मंगळवारी सुरजपूर जिल्ह्यात वन अधिकाऱ्यांना एका हत्तीचा मृतदेह सापडला होता. ही हत्तीण गर्भवती असल्याचं तपासाअंती स्पष्ट झालं होतं. यानंतर बुधवारी याच भागात आणखी एका हत्तीचा मृतदेह वन विभागाच्या अधिकाऱ्यांना सापडला. यानंतर गुरुवारी बलरामपूर जिल्ह्यातील गोपाळपूर भागात वन अधिकाऱ्यांना आणखी एक हत्ती मृताअवस्थेत आढळला आहे. सध्या सर्व हत्तींचं शवविच्छेदन सुरु आहे. प्रथमदर्शनी हे सर्व हत्ती सदृढ अवस्थेत दिसत होते. त्यामुळे यांच्यावर विषप्रयोग करुन त्यांना मारण्यात आलं असावं असा अंदाज वन अधिकारी अरुण पांडे यांनी व्यक्त केला आहे.

हत्तींनी जंगलात ज्या ठिकाणी पाणी प्यायलं त्या पाण्याचे काही नमुने वन विभागाने तपासासाठी पाठवले आहेत. गेल्या काही दिवसांपासून माणूस आणि हत्ती यांच्यात अनेकदा संघर्ष झाल्याच्या घटना छत्तीसगडमध्ये समोर आल्या होत्या. केरळमधील घटनेनंतर सर्व देशभरात संतापाची लाट उसळली होती. त्यामुळे छत्तीसगडमधील हत्तीच्या मृत्यूचं नेमकं कारण काय समोर येतंय हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button