breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

‘पती आपल्या पत्नीच्या पोटातून मुलाच्या रूपाने जन्म घेतो’; संभाजी भिडेंच्या विधानाने वेधलं लक्ष

पुणे : सातत्याने आपल्या वादग्रस्त विधानामुळे चर्चेत असणारे श्रीशिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांचं एक विधान सध्या चांगलेच चर्चेत आहे. त्यांनी नागपुरातील एका कार्यक्रमात मानवाच्या पुनर्जन्माबाबत विधान केलं आहे. भिडे गुरूजींच्या या विधानाने पुन्हा एकदा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

श्रीशिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांनी मानवाच्या पुनर्जन्माबाबत भाष्य केलं आहे. पती आपल्या पत्नीच्या पोटातून मुलाच्या रूपाने जन्माला येतो. तसेच एखादी महिला आपल्या मुलीच्या रूपाने स्वत:जन्म घेत असते, असं अजब विधान संभाजी भिडे यांनी केलं आहे.

हेही वाचा – अजित पवार मुख्यमंत्री होणार? गोपीचंद पडळकरांची प्रतिक्रिया चर्चेत

श्रीशिवप्रतिष्ठान हिदुस्थान संस्थेच्या नागपूर विभागाने सुभाष रोड, गीता मंदिर येथे बुधवारी कार्यक्रम आयोजित केला होता. यावेळी या कार्यक्रामात ते बोलत होते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button